कोरोना व्हायरसच्या थैमानाला आता लोक कंटाळले आहेत. आपल्या घरातील आणि इतरांच्या घरातील होणारे मृत्यू पाहून 'कोरोना(Coronavirus) आता थांब रे बाबा' असं सहजपणे लोकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. दुसरीकडे वॅक्सीनेशनचं कामही वेगाने सुरू आहे. दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येणंही निश्चित असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. अशात आता आणखी एका रिसर्चने आपली चिंता वाढणार आहे. रिसर्च केलेल्या वैज्ञानिकांनुसार, आता आपल्याला कोरोनासोबतच जगण्याची सवय करुन घ्यावी लागणार आहे. रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे की, हा व्हायरस (Virus) कधीच संपणार नाही. म्हणजेच हा कायम जिवंत राहणार.
मेडिकल सायन्सनुसार, कोणत्याही व्हायरसचं अस्तित्व कधीच नष्ट होत नसतं. या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, कोरोना व्हायरस वर्षातून एकदा आपल्या पीकवर असेल. यामुळे अनेकांना आपला जीवही गमावावा लागू शकतो. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. अशातच तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. (हे पण वाचा : Corornavirus : टक्कल असलेल्या लोकांना कोरोनाचा जास्त धोका, अधिक गंभीर आजारी पडण्याचा रिसर्चमधून दावा)
जर्मनीच्या हेडलबर्ग इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थ आणि चायनीज अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सनं कोरोना कायम जिवंत राहाणार असल्याचा दावा केला आहे. हा रिसर्च जनरल साइन्टिफिकमध्येही प्रकाशित केला गेला आहे. या रिपोर्टमध्ये विषाणू दिर्घकाळ राहाणार असल्याच्या दाव्यासोबत इतरही अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. (हे पण वाचा : कोरोना रूग्णाच्या डेड बॉडीला स्पर्श केल्याने संक्रमण पसरतं का? वाचा एक्सपर्ट काय सांगतात....)
या रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, जगातील उत्तर आणि दक्षिणेकडील देशांमध्ये कोरोनाचं थैमान जास्त असेल. सोबतच उन्हाळा, प्रचंड उष्णता किंवा थंडी, यापैकी कोणत्याही स्थितीमध्ये कोरोनाचं थैमान जराही कमी होणार नाही. वातावरणाचा कोरोनाचा प्रभाव कमी करण्यात काहीच उपयोग होणार नाही.
वैज्ञानिकांनी हा रिपोर्ट ११७ देशांमधील आकड्यांच्या आधारावर तयार केला आहे. वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की, कोरोनापासून स्वतःचा बचाव हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी लसीकरणानंतरही कोरोनापासून बचावासाठी करण्यात आलेल्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. मास्क लावा, अंतर ठेवा आणि नियमितपणे हात धुवा.