संपूर्ण जगभरात कोरोनाने हाहाकार पसरवलेला असताना कोरोनाच्या संक्रमणाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. या व्हायरसवर बारकाईनं काम करत असलेल्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस आता कधीच जगातून नष्ट होणार नाही. सजीवांच्या संपर्कात आल्यामुळे हा व्हायरस नेहमीच लोकांबरोबर राहील. जेवढं आपलं शरीर व्हायरसशी लढण्यास जास्त बळकट होईल तेव्हढी व्हायरसची क्षमता कमी होईल.
सजीवांच्या पेशी व्हायरससाठी महत्वपूर्ण
अमर उजालानं दिलेल्या वृत्तानुसार इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि कोरोना विषाणूचे संशोधक समीरन पांडा म्हणतात की, '' कोविड -१९ माहामारीपूर्वी व्हायरस अस्तित्वात होता आणि भविष्यातही कायम राहील.'' डॉ. समीरन पांडा चीनच्या वुहानमध्ये पहिल्या प्रकरणात अहवाल आल्यापासून या प्राणघातक व्हायरसच्या प्रत्येक घटकावर बारीक लक्ष ठेवून आहेत.
अरे व्वा! पुढच्या काही आठवड्यात भारताला मिळणार तिसरी कोरोना लस; भारतीय कंपनीचा दावा
''जिवंत प्राण्यांच्या संपर्कात असल्यास कोणताही विषाणू आपले अस्तित्व सोडणार नाही, कारण व्हायरस वाढविण्यासाठी प्राण्यांच्या पेशी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. म्हणूनच, आता कोरोना विषाणूचा नाश होण्याची शक्यता नाही. हा विषाणू आपल्या आणि आपल्या आजूबाजूला कायम राहील.'', असेही त्यांनी सांगितले.
९० वर्षांपूर्वीचा एंफ्लूएंजा व्हायरस आजही अस्तिवत्वात
डॉक्टर पांडा पुढे सांगतात की, ''जवळपास ९० वर्षांपूर्वीचा एन्फुएंजा व्हायरस आजही अस्तित्वात आहे. तेव्हापासून आजपर्यंत अनेकदा व्हायरसनं रूप बदलली आहेत. त्याच प्रकारे, एका दशकापूर्वी, स्वाइन फ्लूने लोकांच्या जीवनाचा वेग थांबविण्यास सुरुवात केली. स्वाइन फ्लूच्या उपचाराचे काम जसजसे पुढे होत गेले तसतसे व्हायरसचे उत्परिवर्तनही त्याच पद्धतीने झाले. 2009 मध्ये स्वाइन फ्लूमुळे लोक घाबरुन गेले होते परंतू आता या आजाराचं प्रमाण कमी झालं आहे. लोकांमध्ये या आजाराची फारशी भीती राहिलेली नाही. स्वाईन फ्लूमध्ये आताही बदल होत आहे. येत्या काळात कोरोनाचंही स्वरूप बदलत राहील.''
तब्बल ३० वर्षांनंतर महिलेनं उघडलं तोंड; या एका आजारामुळे फक्त द्रव पदार्थांवर होती जीवंत
घाबरण्याची आवश्यकता नाही
कोरोना व्हायरस जीवघेणा असले तरी घाबरण्याचे काहीही कारण नाही. डॉक्टर पांडा यांनी दिलेल्या माहितीनुसार आपली रोगप्रतिकारकशक्ती जितकी मजबूत होईल. तितकाच व्हायरसचा प्रभाव कमी होईल. ज्या लोकांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असते त्यांच्यावर व्हायरस सहजासहजी आक्रमण करू शकत नाही. सरकारकडून लसीकरणास सुरूवात झाली असून जितके जास्त लोक लस घेतील तितकाच कोरोनाचा प्रभाव कमी झालेला पाहायला मिळेल.