तंबाखूचे सेवन शरीरासासाठी नुकसानकारक ठरत असतं. हे माहीत असतानाही जगभरातील अनेक लोक तंबाखूचं सेवन करतात. WHO च्या अहवालानुसार तंबाखूच्या सेवनाने जगभरातील ८० लाख लोकाचा दरवर्षी मृत्यू होतो. सध्याच्या कोरोनाच्या माहामारीत हा धोका वाढला आहे.
तंबाखूचे सेवन करत असलेल्या लोकांना लंग्स डिसॉर्डर, डायबिटिस आणि हायपरटेंशनच्या समस्यांचा सामना करावा लागतो. तंबाखूच्या सेवनाने या आजारांचा धोका वाढू शकतो. एका रिपोर्टनुसार तंबाखू आणि धुम्रपान करत असलेल्यांना कोरोनाचा धोका जास्त असतो.
UCSF च्या सेंट्रल फॉर टॉबॅको कंट्रोल रिसर्च एंड एज्युकेशनचे प्राध्यापक ग्लँट्स यांनी अहवालात दिलेल्या माहितीनुसार धुम्रपान करत असलेल्या लोकांना कोरोनाचा जास्त धोका असतो. चीन, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील काही संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार सिगारेट न पिणाऱ्यांच्या तुलनेत सिगारेट पिणाऱ्यांना कोरोनाचा धोका जास्त असतो. याशिवाय धुम्रपान करत असलेल्या लोकांना रुग्णालयात भरती केल्यास त्यांच बरं होणं खूप कठीण असतं.
धुम्रपान करत असलेल्यांचे शरीर कोरोनाशी लढण्याशी अकार्यक्षम असते. याशिवाय तंबाखूचे सेवन करत असलेल्यांचा मृत्यूदर जास्त आहे. सिगारेट पीत असलेल्या पॉझिटिव्ह लोकांपैकी ४७ टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. व्यसनं आणि नशा यांच्याविरूद्ध लढत असलेल्या तुर्कीतील ग्रीस क्रिसेंट संघटनेचे अध्यक्ष मुसाहित ओज्तुर्क यांनी कोरोनाच्या माहामारीपासून बचावासाठी लोकांना धुम्रपानाचे व्यसन सोडण्याचे आवाहन केलं आहे. कारण त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊन फुफ्फुसांना नुकसान पोहोचतं. परिणामी कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
'या' नवीन लसीने कोरोना विषाणूचा ९९ टक्के खात्मा?; ३ देशात क्लिनिकल ट्रायल सुरु
कोरोनाच नाही तर 'या' आजाराने उद्भवते घसा सुजण्याची समस्या; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय