शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
3
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
4
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
5
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
6
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
7
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
8
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
9
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
10
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
11
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
12
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
13
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
14
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
15
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
17
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
18
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
19
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

Corona Vaccine : कोव्हॅक्सिन लस कोरोनावर ५० टक्के प्रभावी, दिल्लीतील संशोधन; लॅन्सेटमध्ये लेख प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 10:20 AM

ही लस सुरक्षित असल्याचेही या अभ्यासात म्हटले आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)  या संस्थेच्या रुग्णालयातील २,७१४ कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची या अभ्यासासाठी तपासणी करण्यात आली.

भारताची स्वदेशी बनावटीची व दोन डोसची कोवॅक्सिन लस कोरोनाविरोधात ५० टक्के प्रभावी ठरली आहे, असे लॅन्सेटच्या साथरोगविषयक वैद्यकीय नियतकालिकाने म्हटले आहे. दिल्लीत या संदर्भात झालेल्या अभ्यासाच्या अंतरिम निष्कर्षांवर आधारित लेख लॅन्सेटच्या साथरोगविषयक नियतकालिकाने प्रसिद्ध केला आहे.

ही लस सुरक्षित असल्याचेही या अभ्यासात म्हटले आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)  या संस्थेच्या रुग्णालयातील २,७१४ कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची या अभ्यासासाठी तपासणी करण्यात आली. ही प्रक्रिया १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीत पार पडली. या कर्मचाऱ्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. 

देशात डेल्टा विषाणूने कहर माजविला होता त्या काळात हा अभ्यास करण्यात आला. कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस भारत बायोटेकने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त सहभागाने विकसित केली आहे. 

देशातील १८ वर्षे पूर्ण केलेल्या व त्यापुढील वयाच्या लोकांना यंदा जानेवारीपासून कोव्हॅक्सिन लस देण्यास प्रारंभ झाला. जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हॅक्सिनला नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली. 

एम्समधील औषध विभागाचे प्राध्यापक मनीष सोनेजा यांनी सांगितले की, कोरोनावर कोव्हॅक्सिन किती प्रभावी आहे, हे शोधण्याचा या अभ्यासामागे उद्देश होता. डेल्टा विषाणूवर ही लस किती परिणामकारक आहे हेदेखील तपासण्यात आले. लसीकरणामुळे तसेच  मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे या उपायांमुळेही कोरोना प्रसार रोखण्यास खूप मदत झाली आहे. 

‘एम्स’च्या सर्व कर्मचाऱ्यांना दिली कोव्हॅक्सिनएम्सने आपल्या २३ हजार कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून कोव्हॅक्सिन लसच दिली होती. मे महिन्यात झालेल्या पाहणीत आरटी-पीसीआर चाचणी केलेल्या एम्सच्या २७१४ कर्मचाऱ्यांपैकी १,६१७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले तर १०९७ जणांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता. 

देशात कोरोनाच्या ४३७ मृत्यूंत केरळचे ३७०कोरोना विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांमधील अनेक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांनी या लोकांनी कोराेना प्रतिबंधक नियमांचे पालनही केले होते हे विशेष. दिल्लीतील दोन रुग्णालयांत करण्यात आलेल्या या अभ्यासात लसीकरणामुळे विषाणूच्या गंभीर परिणामांना रोखता जरी आलेे तरी कोरोनाची बाधा होण्याचे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. हा अभ्यास इन्सॅकोग कॉन्सॉर्टियम, सीएसआयआर आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या संशोधकांनी केला. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस