(Image Credit- Getty Images)
जगभरासह भारतातही गेल्या २ महिन्यांपासून लसीकरण मोहिम सुरू झाली आहे. भविष्यात कोरोना व्हायरसची लस घेण्यासाठी सुई टोचून घेण्याची गरज पडणार नाही. फक्त एक कॅप्सूल खाल्यानंतर तुम्हाला फायदा होईल. ही कॅप्सूल एक भारतीय औषध कंपनी अमेरिकी औषध कंपनीसह मिळून तयार करत आहे. कॅप्सूल लस भारतात तयार होत आहे. हे औषध तयार करत असलेल्या कंपनीचे नाव प्रेमास बायोटेक (Premas Biotech) बायोटेक आहे. ही कॅप्सूल यायला कितीवेळ लागणार याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भारतीय औषध कंपनी प्रेमास बायोटेक अमेरिकी औषध कंपनी ओरामेड फार्मास्यूटिकल्ससह (Oramed Pharmaceuticals) मिळून ही लस तयार करत आहेत. दोन्ही कंपन्यांनी १९ मार्चला कोरोना व्हायरसची ओरल लस तयार करण्याची घोषणा केली आहे. कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार कॅप्सूल लसीच्या सिंगल डोसनं कोरोनाशी लढण्यासाठी मदत होईल. ही लस खूप प्रभावी आहे.
कॅप्सूल लसीचे नाव ओरावॅक्स कोविड१९ कॅप्सूल आहे. कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार या संशोधनादरम्यान कॅप्सूलची लस खूप प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. ही लस न्यूट्रीलायजिंग एंटिबॉडी आणि इम्यून रिस्पॉन्स ही दोघंही काम करत आहे. यामुळे आपला रेस्पिरेटरी आणि गॅस्ट्रोइंटेस्टाईनल ट्रॅक कोरोना संक्रमण सुरक्षित राहतो. आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा
प्रेमास बायोटेकचे (Premas Biotech) सह संस्थापक आणि प्रंबध मॅनेजर डॉ. प्रबुद्ध कुंडू यांनी सांगितले की, ''ओरावॅक्स कोरोनाची लस वीएलपी नियमांवर आधारित आहे. ही लस कोरोना व्हायरसपासून तीनपटींनी अधिक सुरक्षा देईल. कोरोना व्हायरसचे इंक प्रोटीन, मेम्ब्रेन एम आणि एनवेलप-ई टारगेट्स या तीन्हींपासून बचाव करेल. या औषधामुळे कोरोना व्हायरसच्या संक्रमणानं येत असलेल्या श्वसनाच्या अडथळ्यांपासून बचाव होऊ शकतो.'' तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू