कोरोना व्हायरसच्या माहामारीने संपूर्ण जगभरात हाहाकार निर्माण केला आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. भारतातील अनेक ठिकाणी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळी औषधं तयार करण्याासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान बंगाली मिठाई ज्यांना आवडते. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी तुळस आणि मधाचा अर्क वापरून एक गुणकारी मिठाई तयार करण्यात आली आहे.
पश्चिम बंगाल सरकारने 'आरोग्य संदेश' नावाची नवीन मिठाई बाजारात विक्रीसाठी आणली आहे. ही मिठाई कोरोनाशी लढण्यासाठी व रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरेल. या मिठाईमध्ये सुंदरबनमधील मधाचा वापर केला आहे. या मिठाईच्या सेवनाने प्रतिकारकशक्ती वाढवून आजारांशी लढता येईल.पशुधन संसाधन विकास विभागाचे अधिकारी यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार गाईच्या दूधात सुंदरबनचे मध आणि तुळशीचा अर्क मिसळून ही मिठाई तयार करण्यात आली आहे.
या मिठाईमध्ये कोणतेही कृत्रिम फ्लेवर्स वापरलेले नाहीत. कोलकाता आणि आसपासच्या जिल्ह्यात ही मिठाई ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्याास मदत होईल. कोविड 19 होण्याआधी या मिठाईचे सेवन केल्यास शरीराला फायदा मिळू शकतो. सुंदरबनचे मंत्री मांतुराम पखीरा यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य संदेश तयार करण्यासाठी पीरखली, झारखली आणि सुंदरबनच्या इतर ठिकाणांहून मध मिळवण्यात आलं आहे. पुढील दोन महिन्यात ही मिठाई बाजारात विक्रीसाठी असेल. सर्वसामान्यांना परवडेल अशी या मिठाईची किंमत असणार आहे.
दरम्यान कोरोना रुग्णांची भारतातील संख्या पाच लांखापर्यंत पोहोचली आहे. कोरोनाकाळात अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे. कोरोनाची लागण होऊन नये म्हणून विविध स्तरांवर मास्कचा वापर करणं, सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
थंड खाल्ल्यानंतर कान आणि घश्यात खाज येत असेल; तर तुम्हालाही असू शकते 'ही' समस्या
कोरोनाबाधित रुग्णांना 'या' आजाराचा सगळ्यात जास्त धोका; ३ देशांतील तज्ज्ञांचा खुलासा