शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मुलांमध्ये कोरोना वॅक्सीन घेतल्यावर दिसू शकतात 'हे' सामान्य साइड इफेक्ट्स, काय घ्यावी काळजी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 11:22 AM

Corona Vaccination : मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिल्या दिवशी ३० लाख मुलांना कोरोनाची वॅक्सीन दिली गेली. तर आतापर्यंत १ कोटीपेक्षा जास्त मुलांचं वॅक्सीनेशन झालं आहे.

Corona Vaccination : ३ जानेवारी २०२२ पासून देशात १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींना कोरोना वॅक्सीन (Corona Vaccine) दिली जात आहे. राज्य सरकारांनीही मुलांच्या वॅक्सीनेशनची वेगळी व्यवस्था केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिल्या दिवशी ३० लाख मुलांना कोरोनाची वॅक्सीन दिली गेली. तर आतापर्यंत १ कोटीपेक्षा जास्त मुलांचं वॅक्सीनेशन झालं आहे.

रेडिक्स हॉस्पिटलचे डॉक्टर रवि मलिक यांनी 'आजतक'ला सांगितलं की, 'पालकांनी हे लक्षात ठेवावं की, वॅक्सीनचा पहिला डोज घेतल्यावर मुलं एकाएकी सुपरमॅन होणार नाहीत. पहिल्या डोजनंतर ४ आठवड्याने त्यांना दुसरा डोज दिला जाणार आहे. त्यानंतर ४ आठवड्यांनी इम्यूनिटी विकसित होईल आणि तरीही पुरेशी काळजी घेणं गरजेचं आहे'.

तरूणांच्या वॅक्सीनेशनबाबत बराच उत्साह बघायला मिळत आहे आणि ते वॅक्सीन घेतही आहेत. अशात मुलांच्या पालकांनी मुलांची बेसिक काळजी घेणं गरजेचं आहे. कारण ज्याप्रकारे १८ ते ६० प्लस वयोगटातील लोकांना वॅक्सीनेशन घेतल्यावर काही संभावित साइड इफेक्ट (Corona Vaccine Side Effect) दिसले होते. होऊ शकतं की, ते मुलांमध्येही दिसू शकतील. पण यात घाबरण्याची गरज नाही. याचे फारच हलके साइड इफेक्ट दिसतात. 

लाल निशाण आणि वेदना

हातावर जिथे वॅक्सीन दिली जाते तिथे लाल निशाण किंवा वेदना होऊ शकते. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशननुसार, वॅक्सीनेशनचं लाल निशाण आणि वेदना कमी करण्यासाठी वॅक्सीनेशनच्या जागेवर थंड कापड लावावा. मुलांमध्ये वॅक्सीनेशननंतर गुंगी येणे ही सामान्य बाब आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशननुसार, वॅक्सीनेशननंतर साधारण १५ मिनिटांपर्यंत बसून रहावं किंवा थोडा वेळ बेडवर पडून रहावं याने गुंगी जाईल. यासाठी वॅक्सीनेशन सेंटरवर डॉक्टर वॅक्सीनेटेड लोकांना थोड्या वेळासाठी आपल्या देखरेखीखाली ठेवतात.

हलका ताप

आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टरांनुसार, वॅक्सीनेशननंतर मुलांमध्ये हलका तापही येऊ शकतो. १८ ते ६० वयोगटातील लोकांना हलका ताप आल्यावर पॅरासिटामोल घेण्याचा सल्ला दिला गेला होता. जर मुलांनाही ताप आला तर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांना काही औषध किंवा टॅबलेट द्या.

थकवा आणि अंगदुखी

वॅक्सीन घेतल्यावर मुलांमध्ये थकवा आणि अंगदुखीसारखी समस्या दिसू शकते. जर तुम्हालाही मुलांमध्ये अशाप्रकारची लक्षणं दिसली तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, त्यांना आराम करू द्या आणि जास्तीत जास्त लिक्विड पदार्थ सेवन करण्यास सांगा. 

चक्कर येणे

हा वॅक्सीनचा साइड इफेक्ट नाहीये. वॅक्सीनेशन झाल्यावर काही मुलांना चक्कर येऊ शकते. पण यामुळे घाबरण्याची गरज नाही. असं तेव्हाच होतं जेव्हा मुलं रिकाम्या पोटी वॅक्सीन घेतात. त्यामुळे पालकांनी मुलांना वॅक्सीनला जात असताना त्यांना काहीतरी खायला देऊन पाठवा.   

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या