Covid 19 Booster Dose, WHO: कोरोना महामारीनंतर जगभरात लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली. लसींच्यासोबत त्यासंबंधीचे अनेक समज-गैरसमज परसले. मात्र लसीकरणाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर, सर्वच देशांतील नागरिकांनी लसीकरण करून घेतले. त्यामुळे जगात काही अंशी कोरोनाचा प्रसार आणि प्रचार रोखण्यात साऱ्यांनाच यश आले आहे. मात्र कोरोनाचा पुन्हा एकदा शिरकाव होऊ नये यासाठी बूस्टर डोस घ्यावा असाही प्रचार सरकारकडून करण्यात आला. पण पहिल्या दोन लसीकरणाच्या तुलनेत बूस्टर डोस घेण्याचे प्रमाण फारसे दिसले नाही. त्याच दरम्यान आता WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने बूस्टर डोसबद्दल एक महत्त्वाची माहिती दिली आहे. बूस्टर डोस नक्की कोणत्या लोकांनी घेणे आवश्यक आहे, याबद्दल त्यांनी लसीकरण मार्गदर्शकातून माहिती दिली आहे.
बूस्टर डोस नक्की कोणासाठी आवश्यक?
केवळ उच्च-जोखीम असलेल्या गटातील व्यक्तींनाच कोविड-19 बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. कारण ज्या देशात घनदाट लोकसंख्या आहे, त्या देशातील व्यक्तींची रोग प्रतिकारशक्ती जास्त असल्याने तेथील लोकांवर याचा सर्वात कमी परिणाम होतो, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नवीनतम अहवालात म्हटले आहे. WHOच्या लसीकरण मार्गदर्शक अहवालात, लसीकरणावरील तज्ञांच्या धोरणात्मक सल्लागार गटाकडून असा सल्ला देण्यात आला आहे की प्रत्येक देशाने स्वतःची महामारीविषयक परिस्थिती विचारात घेणे आवश्यक आहे. त्यांच्या शिफारसी अल्प-मध्यम मुदतीच्या नियोजनासाठी आहेत आणि त्या सतत बदल राहतील याची प्रत्येकाने नोंद घ्यायला हवी.
WHO ने तयार केलेले मार्गदर्शक तत्वे ही मुख्यत्वे ऑस्ट्रेलियामधील परिस्थितीशी आधीपासूनच सुसंगत असलेल्या शिफारशींच्या अनुरूप आहेत. तेथे उच्च-जोखीम गटांना म्हणजे ज्यांना इतर दुर्धर आजारांनी ग्रासले आहे, त्यांच्यासाठी बूस्टर डोस घेणे हा प्राधान्यक्रम आहे, असे सांगण्यात आले आहे. WHOच्या मते, बूस्टरसाठी 'उच्च-जोखीम' गटात वृद्ध प्रौढांचा समावेश होतो, मधुमेह आणि हृदयविकार यासारख्या महत्त्वपूर्ण सहव्याधी असलेले तरुण प्रौढ तसेच, सहा महिने किंवा त्याहून अधिक वयाचे HIV (ट्रान्समिटेड) किंवा तत्सम आजाराने ग्रासलेली मुले, प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या आधीन असतानाची रोगप्रतिकारक स्थिती असलेले लोक, गर्भवती महिला आणि आघाडीचे आरोग्य कर्मचारी यांचा समावेश होता.
कोणाला किती डोस आवश्यक?
या उच्च-जोखीम गटाला त्यांच्या शेवटच्या डोसनंतर सहा ते १२ महिन्यांनी बूस्टर मिळायला हवा, ज्याचा डोसचा कालावधी वय आणि रोगप्रतिकारक स्थिती यासारख्या घटकांवर अवलंबून असतो, असे मार्गदर्शक म्हणतात. सामान्यतः 50-60 वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक हे 'निरोगी प्रौढ' मानले जातात. तसेच सहव्याधी असलेली मुले आणि किशोरवयीन मुलांना 'मध्यम प्राधान्य' गट मानले जाते. मार्गदर्शक या गटासाठी एक बूस्टर डोस पुरेसा असल्याची शिफारस करण्यात आली आहे. 'अतिरिक्त बूस्टर्स या गटासाठी सुरक्षित आहेत' असेही WHO ने म्हटले आहे. सहा महिने ते 17 वर्षे वयोगटातील निरोगी मुले आणि किशोरवयीन मुलांचा 'सर्वात कमी प्राधान्य गट' आहे.