जेव्हापासून कोरोनाची लस आली आहेत. तेव्हापासून लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढताना दिसून येत आहे. आधी कोरोनावर कोणतीही लस आणि औषध उपलब्ध नसल्यानं लोक जास्त सावधगिरी बाळगत होते. पण लस आल्यामुळे आपल्याला सगळ्या आजारांपासून सुटका मिळाली असं लोकांना वाटतंय. कारण लस फक्त प्रोटेक्शन आहे. लोक गाईड लाईन्सचं पालन करतील तेव्हाच या आजारापासून बचाव होऊ शकेल. परिणामी संक्रमणाची साखळी तुटून संक्रमणाची तीव्रता कमी होईल.
कोरोनाच्या लसीपासून १०० टक्के बचाव होतो?
सफरजंगच्या कम्यूनिटी मेडिसिनचे प्रमुख. डॉ. जुगल किशोर यांनी सांगितले की, ''कोरोनाची लस आल्यानंतर लोकांची विचारसरणी बदलली आहे. लस आल्यामुळे कोरोनाचा आपल्याला काहीही फरक पडणार नाही असा अनेकांचा समज आहे. पण कोरोनाची लस संसर्गापासून १०० टक्के बचाव करत नाही. संक्रमणामुळे पसरलेल्या आजाराची तीव्रता कमी होऊ शकते. जो लस घेतो,त्याच्यापासून संक्रमण पसरत नाही. मात्र कोणतीही लस माणसांच्या शरीरात १०० एंटीबॉडी विकसित करत नाही. काही लोकांच्या शरीरात एंटीबॉडी तयार होत नाहीत. तर काही लोकांमध्ये कमी प्रमाणात एंटीबॉडीज तयार होतात. ''
डॉक्टरांनी सांगितले की, आतापर्यंत २ लसी आहेत. त्यातील एक ७० टक्के तर दुसरी ८१ टक्के प्रभावी आहे. म्हणजेच या लसीमध्ये ३० टक्के आणि २९ टक्के लोकाना संक्रमणाचा धोका आहे. त्यासाठी लस घेतल्यानंतरही मास्क लावणं, सोशल डिस्टेंसिंग पाळणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, हात धुवत राहणं गरजेचं आहे.
यासंदर्भात डॉ. हरीश गुप्ता म्हणाले की, ''संसर्गाची साखळी थांबविणे हे या लसीचे उद्दीष्ट आहे. जर लोक असेच निष्काळजी राहिले तर ही साखळी तुटणार नाही. लस घेणे फार महत्वाचे आहे, परंतु ज्यांनी ही लस घेतली आहे त्यांनीदेखील प्रतिबंधाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ज्यांना अद्याप लस मिळालेली नाही त्यांना देखील कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करावे लागेल. केवळ मास्कचा वापर सर्वोत्तम उपचार आहे.'' आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा
डॉ. जुगल यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी नुकतीच केंद्राच्या आदेशाने छत्तीसगडचा दौरा केला होता. तेथे दिल्लीप्रमाणे सर्व काही सामान्य झाले आहे, सर्वत्र सामान्य कामकाज सुरू झाले आहेत. रस्ते जाम झाले आहेत, बसेस, गाड्या इत्यादींनी गर्दी केली आहे. पुन्हा संक्रमणाचा प्रसार होण्याचे कारण म्हणजे प्रत्येक टप्प्यावर दुर्लक्ष सुरू झाले आहे. सामान्य लोक नियमांचे पालन करण्यास तयार नाहीत आणि आता सरकारही नियमांचे पालन करण्यास काटेकोर नाही. तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू