न्यूयॉर्क
वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूचा एक नवा आणि सर्वाधिक म्युटेशनवाल्या (New and Highly Mutated Version of Coronavirus) व्हेरिअंटचा शोध लावला आहे. कोरोना विषाणूचा हा नवा व्हेरिअंट हरीणांमध्ये २०२० सालापासूनच म्युटेड होत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिअंटचा शोध दक्षिण-पश्चिम ओंटारियोमधील एका हरीणाच्या शेपटामध्ये आढळून आला आहे.
इतकंच नव्हे, तर याच व्हेरिअंटची लागण ओंटारियोमधील एका रहिवासी व्यक्तीला झाल्याचीही माहिती समोर आली आहे. कोरोनाचा जो नवा व्हेरिअंट हरीणाच्या शेपटीमध्ये आढळून आला होता. त्याच व्हेरिअंटची लागण एका व्यक्तीला झाल्याचं निष्पन्न झालं आहे. संबंधित व्यक्ती हरीणांच्या जवळपास राहत होता. हरीणांमधून माणसांमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचं हे पहिलंच प्रकरण समोर आलं आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ टोरांटो आणि सनीब्रूक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वायरोलॉजिस्ट समीरा मुबारेको यांनी दिलेल्या माहितीनुसार या व्हेरिअंटचा उगम हरीणांमध्येच झाला असल्याचं म्हटलं आहे. त्याच ठिकाणी व्हेरिअंटचं म्यूटेट व्हर्जन तयार झालं आहे. आता हा विषाणू मानवी शरीरातही विकसीत होत आहे. ज्यास संक्रमित हरीणाकडूनच लागण झाली होती. दरम्यान, हरीणांमधून मानावामध्ये याचा संसर्गाचं प्रमाण आणि वेग किती असेल याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पण धोका नक्कीच उद्भवला आहे.
प्राथमिक प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या संशोधनात नवा व्हेरिअंट मानवी शरीरात असलेल्या अँटीबॉडीजला पराभूत करू शकणार नाही, असंही दिसून आलं आहे. यासंबंधीची माहिती तेव्हा समोर आली जेव्हा आणखी एका टीमनं अल्फा व्हेरिअंट अजूनही पेन्सिलवेनियाच्या हरीणांमध्ये अजूनही वावरत असल्याचं लक्षात आलं.
प्राण्यांमध्ये म्युटेशन म्हणजे मनुष्य प्राण्यासाठी अधिक धोकामानवी शरीरात अल्फा व्हेरिअंटचे केसेस अद्याप समोर आलेले नाही. दोन्ही अभ्यासातून हे मात्र कळालं आहे की कोरोना व्हायरस बऱ्याच काळापासून हरीणांमध्ये पसरत आहे. त्यामुळे इतर प्राण्यांनाही याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे जनावरांमध्ये कोरोनाचे विविध व्हेरिअंट निर्माण होण्यास सुरुवात होईल. याचा भविष्यात मनुष्यालाही त्रास होण्याची दाट शक्यता आहे. प्राण्यांमध्ये संक्रमण होऊन एखादा असा व्हेरिअंट तयार होऊ शकतो की जो मानवी शरीरात वेगान पसरण्यास कारणीभूत ठरेल, असा धोका वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, युनिव्हर्सिटी ऑफ सासकाचेवानच्या वायरोलॉजिस्ट अर्जिंय बॅनर्जी यांनी सांगितलं की, सध्यातरी कोणतीही काळजी बाळगण्याचं कारण नाही. पण एका गोष्टीचा धोका मात्र कायम आहे की याच्या संक्रमणाचा वेग किती आहे. जितक्या जास्त जणांना संसर्ग होईल तितकं व्हायरसचे म्युटेट व्हर्जन्स तयार होण्याची शक्यता अधिक बळावते.