दूध हे बर्याच पोषक घटकांचे भांडार आहे आणि भारतात दूध हा रोजच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. दुधात आढळणारे कार्ब, प्रथिने आणि चरबी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, म्हणून प्रत्येकाचाच दूध पिण्यावर भर आहे. गाय आणि म्हशीशिवाय शेळी, उंट आणि मेंढीचे दूधही प्यायलेले जाते. परंतु, बहुतांश लोक केवळ गाय आणि म्हशीचेच दूध वापरतात.
अशा परिस्थितीत बर्याच वेळा मनात हा प्रश्न येतो की, आपण आरोग्याच्या दृष्टीने पाहिले, तर गायीचे दूध किंवा म्हशीचे दूध यापैकी कोणते दूध शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे? बरेचदा लोक म्हशीच्या दुधावर जास्त भर देतात, हे गाईच्या दुधापेक्षा देखील महाग आहे. परंतु, बर्याच प्रकारे गायीचे दूध देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुम्हाला माहित आहे का की, गाय आणि म्हैस यापैकी कोणते दूध तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे…
गाई आणि म्हशीच्या दुधामध्ये फरक काय?गाईचे दूध म्हशीच्या दुधापेक्षा पचनास हलके आणि कमी चरबीयुक्त आहे. तसेच, गायीचे दुध सहज पचते आणि यामुळेच गायीचे दूध मुलांना पिण्यास दिले जाते. त्याच वेळी म्हशीचे दुध मलईयुक्त आणि जाड असते, म्हणून चीज, खीर, कुल्फी, दही, तूप अशा जड वस्तू बनवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर गाईच्या दुधापासून रसगुल्ला, रसमलाई इत्यादी बनवल्या जातात. गायीचे दूध १-२ दिवसातच सेवन करावे, तर म्हशीचे दूध अनेक प्रकारे, बरेच दिवस साठवून ठेवता येते.
त्याच वेळी जर, आपण दुधामध्ये असलेल्या घटकांच्या आधारावर तुलना केली, तर म्हशीच्या दुधात प्रथिने जास्त असतात. तसेच, जास्त चरबी असल्यामुळे म्हशीच्या दुधातही कॅलरी जास्त असतात. गाईच्या दुधात पाण्याचे प्रमाण अधिक, घनतेचे प्रमाण कमी आणि 90% दूध पाण्यापासून बनलेले आहे. म्हशीच्या दुधात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारखे खनिज पदार्थ असतात. पोषक घटकांच्या आधारे जाणून घेऊया यातील फरक…
फॅटगाईच्या दुधात म्हशीच्या दुधापेक्षा फट्स कमी प्रमाणात असतात. याचमुळे, गाईच्या दुधापेक्षा म्हशीचे दूध अधिक जाड असते. गायीच्या दुधात ३-४ टक्के फॅट्स असतात, तर म्हशीच्या दुधात ७-८ टक्के फॅट्स असतात.
प्रथिनेम्हशीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा १० ते ११ टक्के अधिक प्रथिने असतात. प्रथिने जास्त प्रमाणात असल्याने लहान मुलांना आणि वृद्ध व्यक्तींना म्हशीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जात नाही.
कोलेस्ट्रॉलम्हशीच्या दुधात कोलेस्ट्रॉल कमी असते, म्हणूनच हे पीसीओडी, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या समस्या आणि लठ्ठपणामुळे पीडित लोकांसाठी चांगले असल्याचे सिद्ध होते.
कॅलरीहे स्पष्ट आहे की, म्हशीच्या दुधात कॅलरी जास्त असतात. कारण, त्यात प्रथिने आणि फॅट्सचे प्रमाण जास्त असते. एक कप म्हशीच्या दुधात २३७ कॅलरी असतात, तर एका कप गाईच्या दुधात १४८ कॅलरीज असतात.
दोन्ही निष्कर्ष पहिले असता असे म्हणता येईल की, दोन्ही प्रकारचे दूध आपल्यासाठी फायदेशीर आहेत आणि आपल्या गरजेनुसार कोणते दूध प्यावे हे आपण स्वतः ठरवू शकता.