ब्लॅक आणि व्हाइट फंगसनंतर आता Cream Fungus, जबलपूरमध्ये आढळला पहिला रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 08:03 PM2021-05-27T20:03:05+5:302021-05-27T20:28:23+5:30
cream fungus case reported in jabalpur, madhya pradesh : राज्यात आधी कोरोना संसर्गाचे प्रकरणे समोर आली. यानंतर ब्लॅक फंगस, व्हाइट फंगस आणि आता क्रीम फंगसचे रुग्ण आढळत आहेत.
जबलपूर : मध्य प्रदेशच्या जबलपूर येथून ब्लॅक आणि व्हाइट फंगसनंतर आता क्रीम फंगसचा रुग्ण आढळला आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यात पहिल्यांदा ब्लॅक फंगससह क्रीम फंगसचा संसर्ग असलेला रुग्ण आढळला आहे. या पीडित रूग्णांवर नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेजच्या ईएनटी विभागाद्वारे उपचार सुरू करण्यात आले आहेत. राज्यात आधी कोरोना संसर्गाचे प्रकरणे समोर आली. यानंतर ब्लॅक फंगस, व्हाइट फंगस आणि आता क्रीम फंगसचे रुग्ण आढळत आहेत. (cream fungus case reported in jabalpur, madhya pradesh after black and white fungus)
दरम्यान, कोरोना संक्रमित रूग्णांचा पॉझिटिव्हिटी दर कमी होत आहे, तर दुसरीकडे ब्लॅक फंगससह अन्य प्रकारची प्रकरणे वेगाने पुढे येत आहेत. सध्या फंगसच्या रूग्णांची संख्या १०० हून अधिक आहे. सध्या वैद्यकीय महाविद्यालयात 106 रूग्ण आहेत, त्यापैकी 39 रूग्णांवरही शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या रूग्णांपैकी एका रुग्णांमध्ये क्रीम फंगसची पुष्टी झाली आहे, तर 50 पेक्षा जास्त ब्लॅक फंगसचे रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना संक्रमित रूग्णांमध्ये अँटीबायोटिक औषधांचा जास्त वापर शरीरात पोटात आढळणाऱ्या सिम्बायोटिक बॅक्टेरियांना नष्ट करत आहे. कारण मानवी शरीरात सिम्बायोटिक बॅक्टेरिया असणे अत्यंत महत्वाची आहे. या बॅक्टेरिया फंगसचे निर्मूलन करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. दरम्यान, या प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे. प्रादेशिक आरोग्य संचालक डॉ. संजय मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना झाल्यानंतरही मास्क घातल्यास उघड्यामध्ये आढळणाऱ्या ब्लॅक फंगसचे संक्रमण शरीरात प्रवेश रोखू शकते.
(Lockdown in Maharashtra : "राज्यातील सरसकट लॉकडाऊन हटवला जाणार नाही, पण....")
कोरोनानंतर साथीच्या रोग म्हणून उदयास आलेल्या ब्लॅक फंगससाठी आवश्यक असणारी जीवनरक्षक औषधे सर्व रूग्णांना मिळावी, यासाठी आरोग्य विभाग प्रत्येक स्तरावर प्रयत्न करीत आहे. अनेक रूग्णांवर उपचार सुरू आहेत, मात्र यासाठी आवश्यक प्रमाणात लायपोसोमल अॅम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचा पुरवठा होत नाही. हेच कारण आहे की उपचाराचा वेग कमी होत असताना या रोगाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे.
(रोज फक्त 1 रुपयाची बचत करून बनवू शकता 15 लाखांचा मोठा फंड, कसा ते जाणून घ्या...)
18 - 44 वर्षांच्या लोकांना ऑनलाइन नोंदणीशिवाय कोरोना लस मिळणार
आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोक ऑनलाइन नोंदणीशिवाय देखील कोरोनावरील लस घेऊ शकणार आहेत. 18 ते 44 वर्षांच्या लोकांना आता लसीकरण केंद्रातही नोंदणी करता येणार आहे. मात्र, सध्या ही सुविधा केवळ सरकारी केंद्रात उपलब्ध असणार आहे. खासगी रुग्णालयांच्या केंद्रांना अद्याप ऑनलाइन नोंदणी करावी लागेल आणि लससाठी स्लॉट बुक करावा लागेल. दरम्यान, 1 मेपासून केंद्र सरकारने 18 ते 44 वर्षांच्या लोकांना लस देण्यास परवानगी दिली आहे.