शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
2
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
3
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
4
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
5
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
6
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
7
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
8
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
9
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
10
'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन
11
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
12
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
13
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
14
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?
15
"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य
16
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
17
चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा
18
सुवर्णसंधी! ONGC मध्ये 2 हजारांहून अधिक अप्रेंटिस भरती, स्टायपेंड किती मिळणार? पाहा...
19
Beed: चिमुरडीने फोटो बघितला अन् बलात्कारी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक
20
Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते

ब्लॅक आणि व्हाइट फंगसनंतर आता Cream Fungus, जबलपूरमध्ये आढळला पहिला रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 8:03 PM

cream fungus case reported in jabalpur, madhya pradesh : राज्यात आधी कोरोना संसर्गाचे प्रकरणे समोर आली. यानंतर ब्लॅक फंगस, व्हाइट फंगस आणि आता क्रीम फंगसचे रुग्ण आढळत आहेत.

ठळक मुद्देसध्या वैद्यकीय महाविद्यालयात 106 रूग्ण आहेत, त्यापैकी 39 रूग्णांवरही शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

जबलपूर : मध्य प्रदेशच्या जबलपूर येथून ब्लॅक आणि व्हाइट फंगसनंतर आता क्रीम फंगसचा रुग्ण आढळला आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यात पहिल्यांदा ब्लॅक फंगससह क्रीम फंगसचा संसर्ग असलेला रुग्ण आढळला आहे. या पीडित रूग्णांवर नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेजच्या ईएनटी विभागाद्वारे उपचार सुरू करण्यात आले आहेत. राज्यात आधी कोरोना संसर्गाचे प्रकरणे समोर आली. यानंतर ब्लॅक फंगस, व्हाइट फंगस आणि आता क्रीम फंगसचे रुग्ण आढळत आहेत. (cream fungus case reported in jabalpur, madhya pradesh after black and white fungus)

दरम्यान, कोरोना संक्रमित रूग्णांचा पॉझिटिव्हिटी दर कमी होत आहे, तर दुसरीकडे ब्लॅक फंगससह अन्य प्रकारची प्रकरणे वेगाने पुढे येत आहेत. सध्या फंगसच्या रूग्णांची संख्या १०० हून अधिक आहे. सध्या वैद्यकीय महाविद्यालयात 106 रूग्ण आहेत, त्यापैकी 39 रूग्णांवरही शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या रूग्णांपैकी एका रुग्णांमध्ये क्रीम फंगसची पुष्टी झाली आहे, तर 50 पेक्षा जास्त ब्लॅक फंगसचे रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना संक्रमित रूग्णांमध्ये अँटीबायोटिक औषधांचा जास्त वापर शरीरात पोटात आढळणाऱ्या सिम्बायोटिक बॅक्टेरियांना नष्ट करत आहे. कारण मानवी शरीरात सिम्बायोटिक बॅक्टेरिया असणे अत्यंत महत्वाची आहे. या बॅक्टेरिया फंगसचे निर्मूलन करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. दरम्यान, या प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे. प्रादेशिक आरोग्य संचालक डॉ. संजय मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना झाल्यानंतरही मास्क घातल्यास उघड्यामध्ये आढळणाऱ्या ब्लॅक फंगसचे संक्रमण शरीरात प्रवेश रोखू शकते.

(Lockdown in Maharashtra : "राज्यातील सरसकट लॉकडाऊन हटवला जाणार नाही, पण....")

कोरोनानंतर साथीच्या रोग म्हणून उदयास आलेल्या ब्लॅक फंगससाठी आवश्यक असणारी जीवनरक्षक औषधे सर्व रूग्णांना मिळावी, यासाठी आरोग्य विभाग प्रत्येक स्तरावर प्रयत्न करीत आहे. अनेक रूग्णांवर उपचार सुरू आहेत, मात्र यासाठी आवश्यक प्रमाणात लायपोसोमल अ‍ॅम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचा पुरवठा होत नाही. हेच कारण आहे की उपचाराचा वेग कमी होत असताना या रोगाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे.

(रोज फक्त 1 रुपयाची बचत करून बनवू शकता 15 लाखांचा मोठा फंड, कसा ते जाणून घ्या...)

18 - 44 वर्षांच्या लोकांना ऑनलाइन नोंदणीशिवाय कोरोना लस मिळणारआता 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोक ऑनलाइन नोंदणीशिवाय देखील कोरोनावरील लस घेऊ शकणार आहेत. 18 ते 44 वर्षांच्या लोकांना आता लसीकरण केंद्रातही नोंदणी करता येणार आहे. मात्र, सध्या ही सुविधा केवळ सरकारी केंद्रात उपलब्ध असणार आहे. खासगी रुग्णालयांच्या केंद्रांना अद्याप ऑनलाइन नोंदणी करावी लागेल आणि लससाठी स्लॉट बुक करावा लागेल. दरम्यान, 1 मेपासून केंद्र सरकारने 18 ते 44 वर्षांच्या लोकांना लस देण्यास परवानगी दिली आहे. 

 

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलMadhya Pradeshमध्य प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्याMucormycosisम्युकोरमायकोसिस