(Image Credit : Imgflip)
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, बरेच लोक फार जास्त इमोशनल असतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवर रडू लागतात. तसे तर वेदना, त्रास, तणाव, अडचण आणि समस्येच्या स्थितीत तसेच अनेकदा तर आनंदातही अश्रू येतात. काही लोक रडण्याला चांगलं मानतात तर काही लोक वाईट.
पण तुम्ही जर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्हाला रडणं कदापि चुकीचं वाटणार नाही. कारण रडल्याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. मात्र यासाठी अश्रू खरे आणि इमोशनसोबतच यावेत. पण दावा आम्ही नाही तर एका रिसर्चमधून करण्यात आला आहे.
रडल्याने वाढतात स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिसोल
(Image Credit : NewsBeez)
asiaone.com ने दिलेल्या वृत्तानुसार, अभ्यासक विलियम फ्रे यांनी त्यांच्या या रिसर्चला 'द मिस्ट्री ऑफ टीअर्स' म्हणजेच अश्रूंचं रहस्य. या रिसर्चमध्ये फ्रे यांनी अश्रूंच्या therapeutic बाबत म्हणजेच चिकित्सेसंबंधी फायद्यांबाबत समजावण्याचा प्रयत्न करताना सांगितले की, कशाप्रकारे इमोशनल क्राइंग म्हणजे भावनात्मक अश्रूंच्या माध्यमातून तुम्ही वजन कमी करू शकता. खरंतर, रडण्याची पूर्ण प्रक्रिया हॉर्मोन्सशी संबंधित असते आणि रडण्यादरम्यान तुमचा स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिसोलचं प्रमाण वाढतं.
१) स्ट्रेस आणि तणावापूर्ण अश्रूंमुळे शरीरातील अनेकप्रकारचे टॉक्सिन्स(विषारी पदार्थ) बाहेर निघण्यास मदत मिळते.
२) असेही म्हटले जाऊ शकते की, रडणे एक अशी प्रक्रिया आहे जी इमोशनल स्ट्रेसदरम्यान शरीरात तयार होणाऱ्या सबस्टेंसला शरीराच्या बाहेर काढण्यास मदत करतात.
३) असं होण्याचं कारण म्हणजे रडण्यादरम्यान तुम्ही आधीच शरीरातून स्ट्रेसफुल हॉर्मोन्सना बाहेर काढता. त्यामुळे शरीर आणखी जास्त फॅट स्टोर करू शकत नाही.
रात्री ७ ते १० वाजतादरम्यान रडणे फायदेशीर
या रिसर्चमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, तुम्हाला अश्रू वजन कमी करण्यासाठी तेव्हाच मदत करतील आणि तेव्हाच फायदेशीर ठरतील जेव्हा हे सिद्ध होईल की, अश्रू खरे आणि खऱ्या भावनांमुळे निघाले आहेत. सोबतच वैज्ञानिकांनी असेही सांगितले की, रात्री ७ ते १० वाजतादरम्यान रडण्याचा बेस्ट टाइम आहे. या वेळात जर अश्रू खऱ्या भावनांनी भरलेले असतील तर तुमचं वजन निश्चिक कमी होऊ शकतं.
(Image Credit : Video Blocks)
अशात जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्यासाठी वेगवेगळे उपायही करत असाल तर रात्री ७ ते १० या वेळात इमोशनल सिनेमे बघून रडायला सुरूवात करू शकता.