तुम्हाला कल्पना असेलच, व्यायाम करणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. नियमित व्यायाम केल्यास लहान मोठ्या सगळ्याच आजारांना तुम्ही स्वतःपासून लांब ठेवू शकता. कारण चुकीचा आहार, अनियमित जीवनशैलीमुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, कार्डियोवॅस्कुलर डिसीज, लठ्ठपणा, कॅन्सरचा आजार उद्भवण्याची शक्यता असते. याच कारणामुळे आपलं आरोग्य जपणारे लोक नेहमी व्यायाम करतात. तज्ज्ञांच्या एका गटाने नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासातून एक सकारात्मक दावा केला आहे.
एका रिसर्चनुसार सकाळच्यावेळी व्यायाम केल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. जे लोक संध्याकाळी किंवा दुपारी व्यायाम करतात त्यांच्यासाठी हा अभ्यास खूप महत्वाचा आहे. कारण व्यायामाची वेळ बदलून सकाळी व्यायाम केल्यास कॅन्सरचा धोका टाळता येऊ शकतो. इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये हा शोध प्रकाशित करण्यात आला आहे.
व्यायामाची वेळ का महत्वाची?
साधारणपणे व्यायाम करत असलेल्या लोकांच्या तुलनेत व्यायाम न करणाऱ्या लोकांना जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका असतो. ज्यावेळी तुम्ही व्यायाम करत असता त्या वेळेचा वेगवेगळा परिणाम शरीरावर होतो. शरीरातील टायमिंग नियंत्रणात ठेवण्याचे काम सर्केडियन रिदम (circadian rhythm) चे असते.
या रिसर्चमध्ये दिसून आले की, सर्केडीयन रिदम आणि कॅन्सर यांमध्ये घनिष्ठ संबंध असतो. त्याचप्रमाणे सर्केडियन रिदम आणि एक्सरसाइज यांच्यात टायमिंगमध्ये घनिष्ठ संबंध असतो. २०१९ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार दिवसा व्यायाम केल्यानं सर्केडियन रिदम सुधारण्यास मदत होते. याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री झोप चांगली येते.
कॅन्सरचा धोका आणि व्यायामाचं टायमिंग याचा काय संबंध?
तज्ज्ञांना या अभ्यासादरम्यान दिसून आलं की, सकाळी ८ वाजल्यापासून १० वाजेपर्यंत शारीरिक हालचाल जास्त असल्यास ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत मिळते. हा धोका व्यायाम न करणाऱ्यांच्या तुलनेत २५ टक्के कमी असू शकतो. वैज्ञानिकांच्यामते सर्केडियन रिदम व्यतिरिक्त एस्ट्रोजन हार्मोनचीही महत्वाची भूमिका असते. एस्ट्रोजन हार्मोनचा स्तर वाढल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो तसंच एस्ट्रोजनचे उत्पादन सकाळी ७ वाजताच्या सुमारास जास्त होते.
असा करण्यात आला होता रिसर्च?
हा रिसर्च जवळपास ५ वर्ष सुरू होता. त्यात ५ हजारांपेक्षा जास्त लोकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. यातील ७८१ महिला या ब्रेस्ट कॅन्सरच्या शिकार होत्या तर ५०४ पुरूष हे प्रोस्टेट कॅन्सरचे शिकार होते. याव्यतिरिक्त २ हजार ७९५ अन्य लोक स्पेनमधील कॅन्सर रिसर्चमध्ये सहभागी होते. लोकांची जीवनशैली, शारीरिक हालचाल, व्यायाम करण्याची वेळ यांवर माहिती मिळवण्यात आली होती. कोरोना संसर्गामुळे शरीरावर होत आहेत 'असे' परिणाम; तज्ज्ञांनी केला खुलासा, जाणून घ्या उपाय
हा रिसर्च लहान स्तरावर करण्यात आला होता. अधिक स्पष्ट आणि पारदर्शक परिणामांसाठी अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. याशिवाय हे लक्षात घेणंही गरजेचं आहे, जर तुम्हाला सकाळी व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नसेल किंवा शक्य नसेल तर संध्याकाळी व्यायाम करू शकता. कारण व्यायाम न करण्यापेक्षा कोणत्याही वेळी जमेल तसं व्यायाम करणं कधीही उत्तम. काळजी वाढली! २ वर्षांपर्यंत कोरोना पाठ सोडणार नाही; WHO तज्ज्ञांनी दिला 'या' ३ गोष्टींचा सल्ला