Brain Health : मेंदू हा आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव मानला जातो. जो आपल्या पूर्ण शरीराला कंट्रोल करतो आणि कोणतंही काम करण्यासाठी शरीराला संकेत देतो. असात गरजेचं आहे की, तुम्ही तुमच्या मेंदुची काळजी घेतली पाहिजे. हैराण करणारी बाब ही आहे की, तुमच्या काही सवयी तुमच्या मेंदुवर वाईट प्रभाव पाडतात.
आपलं डेली रूटीन आणि वागणूक यामुळे मेंदुवर प्रभाव पडतो. रोज एक्सरसाइज, भरपूर झोप, संतुलित आहार घेतल्याने मेंदुच्या कोशिकांना भरपूर पोषक तत्व आणि ऑक्सिजन मिळतं. तेच खराब लाइफस्टाईल, स्ट्रेस, पुरेशी झोप न घेणं आणि अनहेल्दी पदार्थ खाल्ल्याने मेमरी व ओव्हरऑल मेंदुच्या आरोग्यावर परिणाम होतो.
खराब लाइफस्टाईल - अशा लोकांचा मेंदू वेळेआधीच म्हातारा होतो जे एक्सरसाइज न करता जास्त वेळ बेडवर किंवा सोफ्यावर घालवतात. याने पूर्ण शरीराच्या आरोग्यावर परिणाम होतो. हळूहळू या कारणाने वेगवेगळे आजार होऊ लागतात आणि मेंदू लवकर म्हातारा होतो.
पुरेशी झोप न घेणं - जे लोक रोज 7 ते 8 तासांची झोप घेत नाहीत त्यांचाही मेंदू वेळेआधीच म्हातारा होतो. सोबतच याचा तुमच्या त्वचेवरही परिणाम होतो. कमी झोपल्याने स्ट्रेसही जास्त वाढतो.
स्ट्रेस - स्ट्रेसमुळे मेंदुवर वाईट प्रभाव पडू लागतो. यामुळे मेमरी आणि लर्निंग प्रोसेस पूर्णपणे प्रभावित होते. अशात गरजेचं आहे की, तुम्ही तुमचा स्ट्रेस कंट्रोल करण्यासाठी रोज मेडिटेशन आणि योगा करा.
आहाराची काळजी - तुम्ही काय खाता याचा तुमच्या मेंदुवर फार जास्त प्रभाव पडतो. शुगरचं जास्त सेवन केल्याने तुमचा मेंदू जास्त संकुचित होतो. याने मेंदुपर्यंत जाणाऱ्या ब्लड सेल्सचा फ्लो सुद्धा कमी होतो. मेंदुपर्यत योग्य प्रमाणात रक्त पोहोचलं नाही तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. अशात आहार चांगला आणि संतुलित घ्या.
मोबाइलवर जास्त वेळ - गेल्या काही वर्षांमध्ये लोकांचा स्क्रीन टाइम फार जास्त वाढला आहे. एजिंग अॅन्ड मेकॅनिज्म ऑफ डिजीजमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनमधून निघणारे ब्लू लाइट डोळे आणि त्वचेवर वाईट प्रभाव टाकतात. सोबतच याचा मेंदुवरही वाईट प्रभाव पडतो.