Heart disease : गरम किंवा कोमट पाण्याने आंघोळ करणे नेहमीच फायदेशीर मानलं गेलं आहे. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, दररोज गरम किंवा कोमट पाण्याने आंघोळ कराल तर तुम्हाला हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी राहतो. या रिसर्चनुसार, रोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने हृदविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
जपानमध्ये करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये 30 हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता. ज्यातील 1990 आणि 2009 दरम्यानच्या आंघोळीच्या सवयींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. जर्नल हार्टचे परिणाम प्रकाशित करत अभ्यासकांनी हेही सांगितले की, रोज कोमट पाण्याने आंघोळ करणाऱ्यांना हाय ब्लड प्रेशरचा देखील धोका कमी राहतो.
काय सांगतो रिसर्च?
या रिसर्चमध्ये 30 हजार लोकांच्या आंघोळीच्या सवयींचा अभ्यास केला गेला. ज्यातून हे समजून येतं की, जे लोक गरम किंवा कोमट पाण्याने आंघोळ करत होते त्यांच्यात ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. सोबतच त्यांच्या शरीरातील ब्लड प्रेशर थंड पाण्याने आंघोळ करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक संतुलित होतं. हृदय विकाराचा झटका आणि हृदयरोग टाळण्यासाठी हा एक चांगला उपाय होऊ शकतो.
वैज्ञानिकांनुसार, गरम पाण्यने आंघोळ करणे हे व्यायामाच्या प्रभावासारखं आहे. पण केवळ गरम पाण्याने आंघोळ केल्याने हृदयरोगांवर नियंत्रण मिळवता येईल असं नाही. त्यांनी हेही सांगितले की, गरम पाण्याने आंघोळ करण्याचे काही दुष्परिणामही आहेत.
याची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिकांनी जपान पब्लिक हेल्थ सेंटरमधील 61 हजारपेक्षा अधिक मध्यम वयाच्या लोकांवर करण्यात आलेल्या रिसर्चचा अभ्यास केला. 1990 मध्ये रिसर्चच्या सुरूवातीला 43 हजार लोकांनी त्यांच्या आंघोळीच्या सवयी आणि त्यासंबंधी प्रश्नांची उत्तरे दिली. जीवनशैली, ज्यात व्यायाम, आहार, मद्यसेवन, वजन इत्यादींचा समावेश होता. तसेच सरासरी झोपेचा कालावधी, आधीचे आजार, आणि सध्या कोणत्या औषधांचा वापर करतात याचा अभ्यास केला.
वयोवृद्धांसाठी गरम पाण्याने आंघोळ करणं अधिक फायदेशीर ठरतं. याने त्यांना ब्लड प्रेशर नियंत्रीत ठेवण्यास मदत मिळते. रिसर्चनुसार, गरम पाण्याने आंघोळ केल्यास हृदयासंबंधी आजारांचा धोका 26 टक्के होतो आणि 35 टक्के इतर आजारांचा धोका कमी होतो.
तसेच गरम पाण्याने आंघोळ केल्याने झोप चांगली येते. चांगली झोप होणं हे आरोग्यासाठी फार महत्वाचं आहे. चांगल्या आरोग्यासाठी कमीत कमी 7 तास झोप घेणे गरजेचे आहे.