शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

अॅस्प्रिनने नाही टाळता येत हार्ट अटॅकचा धोका, 'हे' नुकसानही होतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 10:38 AM

एका रिसर्चमधून समोर आले आहे की, रोज अॅस्प्रिन घेतल्यास हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका कमी होत नाही.  

अॅस्प्रिन (Aspirin) एक सॅलिसिलेट औषधी आहे जे वेदना आणि ताप कमी करण्यासाठी दिलं जातं. आधी करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, हार्ट अटॅकनंतर लगेच थोड्या प्रमाणात अॅस्प्रिन घेतल्यास मृत्यू धोका कमी केला जाऊ शकतो. पण आता एका ताज्या रिसर्चनुसार जी बाब समोर आली ती याउलट आहे. एका रिसर्चमधून समोर आले आहे की, रोज अॅस्प्रिन घेतल्यास हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका कमी होत नाही.  

अॅस्प्रिनचा वापर अनेक वर्षांपासून वेदना दूर करण्यासाठी केला जात आहे. तसेच ज्या लोकांना आधी हृदय विकाराचा झटका आला आहे त्यांनी हे औषध घेतले तर त्यांना पुन्हा हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो, अशी १९६० मध्ये या औषधाची ओळख होती.  न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित तीन अभ्यासानुसार, ७० वर्षांच्या निरोगी वयोवृद्धांना दररोज अॅस्प्रिनचा कमी प्रमाणाच डोज(100 मिली ग्रॅम) देऊनही त्यांना हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका कमी झाला नाही. आणि सोबतच वाढत्या  वयासोबत येणाऱ्या इतर आजारांचाही धोका कमी झाला नाही. 

'एएसपीआरईई' नावाच्या या अभ्यासात ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या १९ हजार लोकांवर ७ पेक्षा जास्त अध्ययन केले गेले. ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विश्वविद्यालयाचे प्राध्यापक जॉन मॅकनील यांनी सांगितले की, 'या अनेक वर्षांच्या आणि कठीण अध्ययनातून हे समोर आलं की, वयोवुद्धांना निरोगी ठेवण्यास अॅस्प्रिनची काहीही मदत होत नाही'.

अॅस्प्रिनचे साइड इफेक्ट

१) अस्थमा किंवा इतर श्वासासंबंधी आजाराने पीडित लोकांनी अॅस्प्रिन घेऊ नये. कारण याने त्यांच्या फुफ्फुसामध्ये आकुंचन निर्माण होऊ शकतं.

२) काही लोकांनी काही गोष्टींची अॅलर्जी असते. काहींना अॅस्प्रिनचीही अॅलर्जी असू शकते. 

३) याचे सतत सेवन केल्याने इंटरनल ब्लीडिंगचा धोका असतो. कारण याने रक्त फार जास्त पातळ होतं.

४) १६ वर्षांच्या मुलांना हे दिल्यास त्यांच्या लिव्हरवर आणि मेंदुवर सूज येऊ शकते.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स