शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

दुधीच्या रसाच्या अतिसेवनाचे आहेत धोके, दुष्परिणाम वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 6:23 PM

आयुर्वेद आणि पर्यायी उपचार करणाऱ्यांकडून दुधीचा रस पिण्यास सांगितले जाते. मात्र दुधीच्या रसाचे अतिसेवन केल्यास त्याचे तोटेही होऊ शकतात. जाणून घेऊया दुधीच्या रसाचे तोटे

सकाळी रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचा रस पिणे हृदयरोग, मधुमेह, बद्धकोष्ठता, यकृताच्या समस्या, मूत्राशयाशी निगडीत अडचणी तसेच नैराश्य या समस्या कमी होण्यास मदत होते. आयुर्वेद आणि पर्यायी उपचार करणाऱ्यांकडून हा रस पिण्यास सांगितले जाते. मात्र दुधीच्या रसाचे अतिसेवन केल्यास त्याचे तोटेही होऊ शकतात. जाणून घेऊया दुधीच्या रसाचे तोटेसाखरेचे प्रमाण कमी होणेदुधीभोपळ्याच्या रसाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होऊ लागते. ज्या व्यक्तींच्या शरीरात साखरेचे प्रमाण कमी आहे त्यांनी दुधीचा रस पिऊच नये. असे केल्या चक्कर येते व काहीवेळा डोळ्यासमोर अंधारीही येऊ शकते.

सुज येणेदुधीचा रस अति प्रमाणात प्यायल्याने हातापायांना सुज येते. तसेच शरीरावर लालसर चट्टेही उमटु शकतात. खाजही येऊ शकते.

ब्लड प्रेशर कमी होतेज्या लोकांना जास्त ब्लड प्रेशर आहे त्यांनी दुधीचा रस पिणे उत्तम पण त्याचे अतिसेवन केल्यास पोटॅशिअमचा स्तर वाढतो व ब्लड प्रेशर अत्यंत कमी होते. त्यामुळे हायपोटेंशन सारखे विकार होण्याची शक्यता असते.

उलट्या, जुलाब होणेदुधीचा रस तयार केल्यानंतर ते पिण्या आधी त्याची थोडी चव बघावी. आणि हा रस जर आपणास कडू लागल्यास त्याचे सेवन करू नये कारण यामुळे आपण उलटी, जुलाब व अस्वस्थ होऊ शकते.

कोणत्याही इतर रसासोबत घेऊ नकादुधीचा रस पिताना हे लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे कि, ह्या सोबत इतर कोणताही रस मिसळू नये. यामुळे शरीराला अपाय होतो.

एका दिवसात किती प्रमाणात दुधीचा रस प्यावाएका दिवसात तुम्ही एक ग्लास दुधीचा रस पिऊ शकता. त्यापेक्षा जास्त रस पिऊ नका. काहीजण दुधीचा रस तयार केल्यानंतर काही वेळाने तो रस पितात. हे चूकीचे आहे. दुधीचा रस नेहमी फ्रेश प्यायला पाहिजे.तसेच हा रस दिर्घकाळ बंद बाटलीत असेल आणि चवीला थोडा जरी कडू लागला तरी तो खराब आहे असे समजावे आणि तो अजिबात पिऊ नये. कारण त्यातून गंभीर इजा उद्भवण्याची शक्यता असते.

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स