जगभरात 1 अब्जाहून अधिक तरुण आणि मुलांना ऐकण्यात अडचणी येऊ शकतात. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पर्सनल हियरिंग डिव्हाईस यामध्ये हेडफोन, इअर बड्सचा समावेश आहे. हेडफोन्स व्यतिरिक्त, आपण पार्ट्यांमध्ये जे मोठ्या आवाजात संगीत ऐकतो त्याने देखील बहिरेपणाचा धोका वाढत आहे. भारतातही 6.5 कोटींहून अधिक लोक आंशिक किंवा पूर्ण बहिरेपणाचे बळी आहेत आणि सतत हेडफोनच्या वापरामुळे हा धोका आणखी वाढत आहे.
बीएमजे हेल्थ ग्लोबल (ब्रिटिश मेडिकल जर्नल) ने आपल्या अहवालात केलेला दावा अतिशय अस्वस्थ करणारा आहे, त्यानुसार हेडफोन, इअरफोन इत्यादींवर मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने जगभरातील 1 अब्जाहून अधिक तरुण आणि लहान मुलांचं आरोग्य बिघडते. ऐकण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
जगभरातील कोट्यवधी लोकांना समस्या
डब्ल्यूएचओच्या संशोधनानुसार, सध्या 43 कोटींहून अधिक लोक ऐकण्याच्या समस्येने ग्रस्त आहेत. वेळीच लक्ष न दिल्यास 2050 पर्यंत ही संख्या 700 मिलियन (70 कोटी) पर्यंत वाढेल. त्याच वेळी, असेही म्हटले आहे की 2050 पर्यंत प्रत्येक 4 पैकी 1 व्यक्तीला ऐकण्याच्या समस्येचा सामना करावा लागेल. भारतात 6.5 कोटी लोक असे आहेत ज्यांना कमी ऐकू येतं किंवा ऐकू येत नाही.
मोठ्या आवाजामुळे होतात आजार
डब्ल्यूएचओने सांगितले की, सुरुवातीला लोक बहिरेपणाला गांभीर्याने घेत नाहीत. लोकांना हा आजार समजण्यासाठी 4 ते 6 वर्षे लागतात. तोपर्यंत ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याच्या उपचारासाठी त्यांना हिअरिंग एड नावाचे मशीन बसवावे लागेल. भारतात दरवर्षी सुमारे 6 लाख श्रवणयंत्रे विकली जातात. कानाच्या समस्या गांभीर्याने न घेतल्याने लोक लवकर बहिरे होतात. यामुळे लोक विस्मरण किंवा नैराश्यासारख्या अनेक मानसिक आजारांना बळी पडतात.
मोठ्या आवाजामुळे होतात 'या' समस्या
- बहिरेपणा- कान दुखणे- कानाला इन्फेक्शन- डोकेदुखी- निद्रानाश- चक्कर येणेएका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"