शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
3
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
4
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
5
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
6
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
7
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
8
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
9
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
10
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
11
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
12
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
13
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
14
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
15
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
16
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
17
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
19
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
20
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे महिलांमध्ये जाडेपणा आणि डायबिटीजचं कारण - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2019 10:15 AM

सध्या भारतात बदलत्या लाइफस्टाइलमुळे वाढणाऱ्या वजनाने पुरुष आणि महिला सुद्धा हैराण आहेत. ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.

सध्या भारतात बदलत्या लाइफस्टाइलमुळे वाढणाऱ्या वजनाने पुरुष आणि महिला सुद्धा हैराण आहेत. ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामागची कारणे वेगवेगळी असतात. मात्र भारतीय महिलांचं वजन वाढण्याचं आणि त्यांना डायबिटीज होण्याचं एक मुख्य कारण समोर आलं आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नलच्या एका अभ्यासानुसार, भारतीय महिलांमध्ये जाडेपणा आणि डायबिटीज होण्याचं कारण हे त्यांच्या व्हिटॅमिन डी ची कमतरता हे आहे. 

भारतीय महिलांवर करण्यात आलेल्या या अभ्यासानुसार, भारतातील ६८.६ टक्के महिलांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे. तर २६ टक्के महिलांमध्ये व्हिटॅमिन डी फारच कमी आढळले आहे. तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की, देशातील केवळ ५.५ टक्के महिलाच अशा आहेत, ज्यांच्या शरीरात योग्य प्रमाणात व्हिटॅमिन डी चं प्रमाण आढळलं आहे. 

हा अभ्यास एम्स, डायबिटीज फाउंडेशन ऑफ इंडिया अॅन्ड नॅशनल डायबिटीज आणि ओेबेसिटी अॅन्ड कोलेस्ट्रॉल फाउंडेशनच्या अभ्यासकांनी मिळून केला. खरंतर जगभरातील लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता ही एक पब्लिक हेल्थ समस्या आहे. याचा थेट संबंध जाडेपणाशी आहे. या अभ्यासात केवळ महिलांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं. 

सूर्यकिरणांपासून दूर

या अभ्यासात सहभागी अभ्यासक सांगतात की, भारतातील जास्तीत जास्त महिला या घरात राहतात, हे त्यांच्यात व्हिटॅमिन डी ची कमतरता असण्याचं मुख्य कारण आहे. त्यांच्या कपडे परिधान करण्याच्या पद्धतींमुळेही सूर्य प्रकाशासोबत त्यांचां संबंध येत नाही. त्यामुळे त्यांना सूर्य किरणांमधून मिळणारं व्हिटॅमिन डी त्यांना मिळू शकत नाही. या अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात की, उत्तर भारतातील महिलांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता अधिक प्रमाणात बघायला मिळाली.

इतरही होतात समस्या

व्हिटॅमिन डी ची शरीरात कमतरता असेल तर वेगवेगळ्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि पोषण मिळवण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असणं गरजेचं असतं. पण सद्याच्या लाइफस्टाइलमध्ये अनेकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे व्यक्तीला नेहमी थकवा जाणवतो. इतकेच नाही तर व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे कमजोर होऊ लागतात. ज्या व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळते ते व्यक्ती नेहमी आळस करताना दिसतात. 

व्हिटॅमिन डी हे मनुष्याला काही पदार्थ आणि सूर्य प्रकाशातून मिळतात. व्हिटॅमिन डी हे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे व्हिटॅमिन डी २ आणि दुसरं व्हिटॅमिन डी ३ हे दोन्ही व्हिटॅमिन शरीरात कमी असतील तर व्यक्तीला कमजोरी येते. चला जाणून घेऊ व्हिटॅमिन डी कमी असल्यावर दिसणाऱ्या लक्षणांबाबत....

हाडे आणि मांसपेशी

जर तुमच्या हाडांमध्ये वेदना आणि कमजोरी सोबतच मांसपेशींमध्ये सतत वेदना होत असतील तर यांचं कारण व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकतं. व्हिटॅमिन डी हाडांसाठी अत्यावश्यक असण्यासोबतच दातांसाठी आणि मांसपेशींसाठीही महत्त्वाचं पोषक तत्व आहे. 

मूड स्विंग आणि स्ट्रेस

शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरतेचा थेट प्रभाव तुमच्या मूडवर पडतो. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे शरीरात सेरोटोनिन हार्मोनच्या निर्मितीवर प्रभाव पडतो. याच कारणाने तुमच्या मूडमध्ये सतत बदल होतो. 

थकवा आणि आळस

जर तुम्हाला तुमच्यात ऊर्जेची कमतरता जाणवत असेल, तसेच थकवा आणि आळस जाणवत असेल तर तुमच्यात व्हिटॅमिन डी ची कमतरता असू शकते. अशात वेळीच याची तपासणी करावी. 

ब्लड प्रेशरची समस्या

जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर याचा प्रभाव तुमच्या ब्लड प्रेशरवर पडू शकतो. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे नेहमी ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होऊ शकते.

स्मरणशक्ती आणि भ्रम

खासकरुन महिलांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास त्यांना तणावाचा अधिक सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना निराशा येते. महिलांना व्हिटॅमिन डीची अधिक गरज असते.  

टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्स