शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पहिल्यांदाच कोरोनाचं 'असं' रुप आलं समोर; ४ वेळा महिलेची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली; अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 11:43 AM

CoronaVirus : महिलेचे रिपोर्ट पाहून डॉक्टरही अवाक् झाले आहेत. दिल्लीतील एम्स रुग्णालयात एका महिलेची प्रकृती गंभीर असल्यामुळे उपचारासाठी तिला दाखल करण्यात आलं होतं. 

जगभरात कोरोनाचं थैमान पसरलं आहे.  कोरोनाच्या प्रसाराबाबत संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. जसजसा कोरोना विषाणूंचा प्रसार वाढत आहे. तसतशी कोरोना व्हायरसची नवनवीन लक्षणं समोर येत आहेत. कोरोनाबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना दिवसेंदिवस आपलं रूप बदलत आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात असाच एक प्रकार समोर आला आहे. महिलेचे रिपोर्ट पाहून डॉक्टरही अवाक् झाले आहेत. दिल्लीतील एम्स रुग्णालयात एका महिलेची प्रकृती गंभीर असल्यामुळे उपचारासाठी तिला दाखल करण्यात आलं होतं. 

डायबिटिस आणि हायपरटेंन्शनची समस्या असल्यामुळे प्रकृती अधिकच खालावत होती. म्हणून या महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली. तुमचा विश्वास बसणार नाही पण या वृध्द महिलेची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. एकदा नाही तर तब्बल चारवेळा या महिलेचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. या महिलेला कोरोना संसर्ग झाल्याची शंका डॉक्टरांना आल्याने त्यांनी सर्वात अत्याधुनिक असलेलं तंत्रज्ञान आरटी-पीसीआरच्या सहाय्याने चाचणी केली. पण तरी या ८० वर्षीय महिलेची कोरोना चाचणी १२ दिवसांत ४ वेळा करूनही निगेटिव्ह आली.

चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे डॉक्टरांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर त्यांनी या महिलेचे उपचार सुरू केले. ज्यावेळी पाचव्यांदा या महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली त्यावेळी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेल्या एंटीबॉडीज विकसित झाल्याचं दिसून आलं. माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार २५ जून ते ७ जुलैदरम्यान या महिलेची चाचणी करण्यात आली होती. पण सातत्याने चाचणी करूनही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे आरटी-पीसीआर ही चाचणी कोरोनाचा शोध  घेण्यासाठी उत्तम ठरली.  

उपचार सुरू केल्यानंतर पुन्हा तपासणी केल्यानंतर जेव्हा कोरोनाविरुद्ध लढत असलेल्या एंटीबॉडीज विकसित झाल्याचे कळले तेव्हा डॉक्टर चांगलेच चक्रावले. या महिला रुग्णाची केस लक्षात घेता लक्षणं दिसत नसतानाही शरीरात कोरोनाचं आक्रमण होऊ शकतं  हे दिसून आले. 

या कालावधीत व्हायरसची जीनोमिक संरचना बदलत आहे. कोरोना व्हायरसच्या नवीन लक्षणांमध्ये डोळे येणं, मळमळणं, अतिसार होणं यांचा समावेश आहे. याशिवाय थंडी वाजणे, श्वास घ्यायला त्रास होणं, मासपेशींमध्ये वेदना, डोकेदुखी, घसा खवखवणं, सुगंध न जाणवणं, श्वास घ्यायला त्रास होणं यांचा समावेश आहे.

समोर आली कोरोनाची ३ नवी लक्षणं; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात, वेळीच सावध व्हा

CoronaVirus News : कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात; जाणून घ्या, किंमत...

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या