शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटबाबत वैज्ञानिकांनी दिली महत्वपूर्ण माहिती, वाचा घाबरण्याची गरज आहे की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 4:29 PM

अनेक रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं आहे की डेल्टा प्लस व्हेरिएंट कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं कारण ठरू शकतो. इतकंच नाही तर तज्ज्ञांचं मत आहे की, या व्हेरिएंटबाबत ज्याप्रमाणे लोकांना घाबरवलं जात आहे, ते योग्य नाही.

कोरोना व्हायरसची(Coronavirus) दुसरी लाट येण्याला आरोग्य तज्ज्ञ डेल्टा व्हेरिएंटला (Delta Variant) जबाबदार मानतात. तोच डेल्टा व्हेरिएंट भारतातच नाही जगभरात एक मोठी समस्या म्हणून समोर येत आहे. डेल्टा व्हेरिएंट आणि त्याच्या म्यूटेटेड डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत (Corona Delta Plus Variant) भीतीचं वातवरण बघितलं जात आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं आहे की डेल्टा प्लस व्हेरिएंट कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं कारण ठरू शकतो. इतकंच नाही तर तज्ज्ञांचं मत आहे की, या व्हेरिएंटबाबत ज्याप्रमाणे लोकांना घाबरवलं जात आहे, ते योग्य नाही.

वैज्ञानिक म्हणालले की, डेल्टा स्ट्रेनबाबतच्या बातम्यांना खळबळजनक पद्धतीने प्रसारित केलं जाऊ नये. डेल्टा स्ट्रेन जास्त संक्रामक आहे. पण हा मूळ व्हायरसप्रमाणेच पसरतो. याबाबत समजून घेण्याची गरज आहे. भीतीच्या वातावरणात याच्याशी सामना करणं लोकांसाठी सोपं नसेल.

यूनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नच्या स्कूल ऑफ पॉप्युलेशन अॅन्ड ग्लोबल हेल्थचे प्रमुख प्राध्यापिका नॅन्सी बॅक्सटर म्हणाल्या की, 'फ्लीटिंग कॉन्टॅक्ट एक चांगला विश्लेषक आहे ज्याने व्हायरसच्या एअरबॉर्न प्रकृतीबाबत समजून येतं. प्राध्यापिका नॅन्सी म्हणाल्या की, संक्रमित व्यक्तीच्या शिंकण्याने किंवा खोकल्याच्या माध्यमातून व्हायरस हवेत जाऊ शकतो. अशात आजूबाजूने जात असलेल्या व्यक्तीच्या शरीरात श्वास घेत असताना व्हायरस जाऊ शकतो. कोरोनाचं मूळ रूप आणि डेल्टा व्हेरिएंट दोन्हीबाबत असं होऊ शकतं. अशात डेल्टा व्हेरिएंट फार जास्त एअरबॉर्न असल्याची सूचना देऊन लोकांना घाबरवणं सोडलं पाहिजे. (हे पण वाचा : Corona Vaccine: कोणत्या व्यक्तीला कोरोनापासून वाचण्यासाठी दरवर्षी ‘बूस्टर डोस’ची गरज भासेल? WHO नं सांगितलं...)

यूनिव्हर्सिटी ऑफ न्यू साउथ वेल्सच्या किर्बी इन्स्टिट्यूटमध्ये जैव सुरक्षा अनुसंधान प्रोजेक्टचे प्रमुख प्रो. रॅना मॅकिनटायर म्हणाले की, 'घरात भलेही एकाचवेळी जास्त लोक नसतील तरीही एअरबॉर्न ट्रान्समिशनची शक्यता राहतो. घरात जर चांगली व्हेंटिलेशनची व्यवस्था नसेल आणि प्रत्येक व्यक्ती संक्रमित असेल तर व्हायरस अनेक तास रूममध्ये राहू शकतो. डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबतही तेच आहे जे कोरोनाच्या दुसऱ्या व्हेरिएंटबाबत आहे. त्यामुळे घाबरण्यापेक्षा जास्त बचावावर लक्ष दिलं पाहिजे.

किती संक्रामक आहे व्हायरसचं नवं रूप?

ला ट्रोब यूनिव्हर्सिटीमध्ये सहाय्यक प्राध्यापक असलेले हसन वली म्हणाले की, डेल्टा व्हेरिएंट भलेही अधिक संक्रामक मानला जात असला तरी या व्हेरिएंटचा प्रसारही तसाच होता जसा याच्या मूळ रूपातील व्हायरसचा होतो. यूकेतील आकडेवारीनुसार, अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत घरगुती संपर्काने डेल्टा व्हेरिएंटची संक्रामकता ६० टक्क्यांच्या आसपास आहे. तेच अल्फा व्हेरिएंटचे आकडे सांगतात की, हा मूळ व्हायरसच्या तुलनेत ४३ ते ९० टक्के अधिक संक्रामक होऊ शकतो. अशात डेल्टा व्हेरिएंटच्या संक्रामकतेला फार जास्त घाबरण्याची गरज नाही.

कसा करायचा बचाव?

ऑस्ट्रेलियन नॅशनल यूनिव्हर्सिटीचे एक वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. मेरू शील म्हणतात की, डेल्टा व्हेरिएंटपासून बचावासाठी तेच उपाय आहेत, जे आतापर्यंत वापरले जात आहेत. त्यामुळे या व्हेरिएंटबाबत भीतीदायक वातावरण तयार करण्याची गरज नाही. हे खरं आहे की कोरोनाचे नवे व्हेरिएंट समोर येत आहेत. यातील काही अधिक संक्रामक होऊ शकतात तर काही कमी. कोविड-१९ पासून बचावासाठी उपाय करण्यात कोणतंही दुर्लक्ष करू नका. मास्क वापरा, हात धुवा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळं, लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा. याच उपायांनी कोरोनाच्या नव्या रूपाला हरवलं जाऊ शकतं. या लढाईत वॅक्सीनेशनची महत्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे वॅक्सीन नक्की घ्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य