(Image Credit : brightfocus.org)
पुढील २ दशकांमध्ये म्हणजेच २० वर्षात डिमेंशिया म्हणजेच वेडसरपणाने पीडित लोकांची संख्या दुप्पत होण्याची अंदाज आहे. तर २०४० पर्यंत ब्रिटनमध्ये डिमेंशियाने पीडित लोकांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, डिमेंशिया आणि खासकरून अल्झायमरसारखे आजार सोसायटीमधे अधिक वेगाने वाढत आहेत. ही स्थिती केवळ एका देशात नाही. जगभरात मानसिक आजारांनी पीडित लोकांची संख्या वेगाने वाढत आहे.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅन्ड पॉलिटिकल सायन्सेस आणि अल्झाइम्स सोसायटी द्वावे करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये यूनायटेड किंगडममधे २०४० पर्यंत डिमेंशियाने पीडित लोकांवर देशातील इकॉनॉमीचा एक मोठा भाग खर्च होण्याची वेळ येणार आहे.
या रिसर्चच्या विश्लेषणात असं आढळून आलं की, डिमेंशियाने पीडित लोकांचा खर्च परिवारांवर वाढणार आहे. अशात जर एकाच घरात दोन पीडित असतील तर त्यांना घरखर्च चालवणे देखील कठीण होऊ शकतं. या रिसर्चच्या निष्कर्षाच्या आधारावर सांगण्यात आलं आहे की, आपल्याला लवकरच मानसिक आरोग्यावर प्रभावी पाऊल उचलावे लागतील, नाही तर मानसिक आजाराने पीडित लोकांची संख्येचा दबाव वाढेल.
सूत्रांनुसार, निवडणुकांआधी अल्झायमर सोयायटी सर्वच राजकीय पक्षांना भेटून डिमेंशियाच्या वाढत्या स्थितीवर काम करण्याची मागणी करणार आहेत. आता यावर काय उपाय केले जातील हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.