Dengue fever: दरवर्षी देशातील वेगवेगळ्या भागात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान डेंग्यू वेगाने पसरतो. अनेक ठिकाणी डेंग्यूमुळे जीव गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पण फक्त प्लेटलेट्स कमी होणंच डेंग्यू नाहीये. चला जाणून घेऊ कोणत्या स्थितींमध्ये डेंग्यू जीवघेणा ठरू शकतो आणि कसा कराल बचाव.
कसा होतो हा आजार?
डेंग्यूचा ताप मादा एडीज डास चावल्याने येतो. हे डास घाणीत नाही तर स्वच्छ ठिकाणी वाढतात. जे लोक शहरात स्वच्छ ठिकाणी राहतात त्यांना डेंग्यूचा धोका अधिक असतो. डेंग्यू तीन प्रकारचा असतो. डेंग्यू ताप, डेंग्यू हेमरेजिक ताप आणि डेंग्यू शॉक सिंड्रोम. डेंग्यू हेमरेजिक तापाता नाकातून, हिरड्यातून आणि उलटीमधून रक्त येतं. तर डेंग्यू शॉक सिंड्रोममध्ये रूग्ण अस्वस्थ राहतात. इतकंच नाही तर अनेकदा रूग्ण बेशुद्ध होतात आणि ब्लड प्रेशरही कमी होऊ लागतं.
कधीपर्यंत असतो धोका
जेव्हा पाऊस कमी होऊ लागतो आणि थंडी वाढते तेव्हा डेंग्यूच्या केसेस जास्त समोर येतात. नोव्हेंबरपर्यंत डेंग्यूचा धोका अधिक राहतो. काही लोकांना असं वाटतं की, हा आजार एकमेकांना स्पर्श केल्याने होतो. पण अजिबात नाहीये. ज्या व्यक्तीच्या रक्तात डेंग्यू व्हायरस असतो, त्याला चावल्यानंतर डास संक्रमित होतो. मग हा डास जेव्हा इतर लोकांना चावतो तेव्हा त्यांना डेंग्यूचा धोका असतो.
काय आहे प्लेटलेट्स?
डेंग्यू तेव्हा जास्त गंभीर होता जेव्हा रूग्णाच्या रक्तात प्लेटलेट्स कमी होऊ लागतात. अशात तर तुमच्या प्लेटलेट्स आधीच कमी असतील तर डेंग्यू तुम्हाला लवकर होऊ शकतो. डेंग्यूमध्ये जेव्हा प्लेटलेट्स कमी होतात तेव्हा याला थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणतात. तसा तर डेंग्यू प्लेटलेट्सला नष्ट करत नाही. पण प्लेटलेट काउंट आणि त्यांच्या कामाला खराब करतो. एका निरोगी व्यक्तीमध्ये 1.5 ते 4.5 लाख प्लेटलेट्स असायला हव्यात. प्लेटलेट्स 20 हजारांपेक्षा कमी झाल्या तर जीवाला धोका होऊ शकतो.
किती दिवसात बरे व्हाल?
डेंग्यूचे रूग्ण अॅलोपॅथी उपचाराने बरे झाल्यावर आयुर्वेद उपचार किंवा घरगुती उपायांनी लवकर रिकव्हर होऊ शकतात. सामान्यपणे डेंग्यूची लक्षण 4 ते 10 दिवस राहतात. कधी कधी ताप दोन आठवडेही राहतो. हे रूग्णाच्या इम्युनिटीवर अवलंबून असतं.
डेंग्यूची लक्षण (dengue symptoms)
डोकेदुखी, मांसपेशी आणि हाडांमध्ये वेदना, थंडी वाजून ताप येणे, मळमळ होणे, उलटी येणे, डोळ्यांमध्ये वेदना, त्वचेवर लाल चट्टे येणे, तोंडाची चव बलदणे.
काय घ्याल काळजी
- वेळेवर टेस्टिंग आणि योग्य उपचार न घेतल्याने 3-4 दिवसात रूग्णाची स्थिती गंभीर होऊ शकते.
- लहान मुले, वयोवृद्ध आणि गर्भवती महिलांना याचा धोका अधिक असतो.
- डायबिटीस, किडनी, बीपीच्या रूग्णांनी जास्त काळजी घ्यावी.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घेऊ नये.
- रूग्णाने भरपूर पाणी प्यावे.
- डेंग्यूतून बाहेर येण्यासाठी आवळा, कीवी, संत्री यांसारखी आंबट फळे खावीत. डाळिंब आणि पपई सुद्धा खाऊ शकता.
- आवळा, नारळाचं पाणी याने इम्युनिटी वाढते आणि प्लेटलेट्सही वाढतात.