हवामानात बदल होताच सर्वत्र डेंग्यूने कहर केला आहे. डेंग्यू तापापासून सावध राहण्याचा सल्लाही आरोग्य तज्ज्ञ देतात. डेंग्यू रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. संक्रमित व्यक्तीच्या आसपास राहून तुम्हाला डेंग्यू ताप येऊ शकत नाही. डेंग्यूचा प्रसार हा डास चावण्याने होतो. डेंग्यूचा व्हायरस पसरवणारे दोन प्रकारचे डास आहेत, जे घराभोवती आणि शेजारच्या परिसरात असू शकतात.
डेंग्यूपासूनही स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावं?
- मच्छरदाणी लावूनच झोपा.- घरामध्ये किंवा आजूबाजूला पाणी जमा होऊ देऊ नका. - कूलरमधील पाणी रोज बदलत राहा.- पूर्ण कपडे घालूनच बाहेर जा.- पाण्याची टाकी झाकून ठेवावी.- कीटकनाशके आणि अळीनाशक औषधे वापरा.- सकस आहार आणि जीवनशैलीचा अवलंब करा.- शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी योग्य ती पावले उचला.
डेंग्यू झाल्यास काय करायचं?
- डेंग्यू तापाची लक्षणं दिसू लागल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- डॉक्टर शक्य तितके पाणी आणि नारळ पाणी पिण्याचा सल्ला देऊ शकतात.- किवी, पपई, बीटरूट, डाळिंब आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा.- शरीराला शक्य तितकी विश्रांती द्या.- डेंग्यूच्या गंभीर प्रकरणांमध्ये, रक्त, प्लेटलेट ट्रान्सफ्यूजन किंवा ऑक्सिजन थेरपी दिली जाऊ शकते.
डेंग्यू तापामुळेही होऊ शकतं नुकसान
डेंग्यू तापामुळे ब्लड सर्कुलेशन आणि अवयवांचं नुकसान होऊ शकते. ब्लड प्रेशर धोकादायक पातळीपर्यंत खाली येऊ शकतं. काही प्रकरणांमध्ये, तापाने मृत्यू देखील होऊ शकतो. गरोदरपणात डेंग्यू तापाने ग्रस्त असलेल्या महिला प्रसूतीदरम्यान बाळामध्ये व्हायरस पसरवू शकतात.
'ही' आहेत लक्षणं
- डोकेदुखी- स्नायू, हाडं किंवा सांधे दुखणे- मळमळ- उलट्या- डोळे दुखणं- पुरळ