पावसाळ्यात गरमीपासून थोडा आराम मिळतो पण अनेक आजारही सक्रिय होतात. हे सर्व आजार, विशेषतः बॅक्टेरिया आणि व्हायरसशी संबंधित आहेत. पावसाचं आगमन होताच डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढू लागतात. डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात. डेंग्यूचा केवळ शरीरावरच नाही तर मेंदू आणि शरीराच्या संपूर्ण न्यूरोलॉजिकल सिस्टमवर वाईट परिणाम होतो.
आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात?
फोर्टिस हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख संचालक डॉ. प्रवीण गुप्ता यांनी डेंग्यू आणि न्यूरोलॉजिकल समस्यांबाबत आपले मत मांडलं. ते म्हणाले की, डेंग्यू ताप हा डास चावल्याने होतो. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती झपाट्याने सुरू होते. त्याची सुरुवातीची लक्षणं फ्लूसारखीच असतात. डेंग्यूचा आपल्या शरीरातील न्यूरोलॉजिकल सिस्टमवरही परिणाम होतो. डेंग्यूची लक्षणं अनेक प्रकारे दिसून येतात. परंतु हजारोंपैकी फक्त एक व्यक्ती मेंदूशी संबंधित लक्षणं दर्शवते.
डेंग्यूचे व्हायरस मेंदूपर्यंत पोहोचतात. त्यामुळे सेंट्रल नर्व्हस सिस्टम संबंधित अनेक लक्षणं शरीरावर दिसू लागतात. डेंग्यू एन्सेफलायटिस असं या आजाराचं नाव आहे. डेंग्यूची न्यूरोलॉजिकल लक्षणं हजारांपैकी एका व्यक्तीमध्ये दिसून येतात. तथापि, त्याची प्रकरणं फारच कमी आहेत. यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये एन्सेफलायटिस, मेनिन्जायटिस आणि मायलायटिस यांचा समावेश होतो. अशा परिस्थितीत हा व्हायरस रक्ताद्वारे मेंदूपर्यंत पोहोचतो. त्यामुळे मेंदूच्या आत सूज येते आणि पाठीच्या कण्यामध्ये सूज येते आणि इन्फेक्शनही होतं.
डेंग्यू एन्सेफलायटीसमुळे शॉक सिंड्रोम होतो. हे मानवी मेंदूशी जोडलेलं आहे. डेंग्यू आजारामुळे लोकांमध्ये न्यूरोलॉजिकल लक्षणं दिसून येतात. ज्याला एन्सेफलायटीस म्हणतात. या आजाराचा मानवी मनावर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे माणसाच्या मानसिक स्थितीत अनेक बदल होतात. व्यक्ती कोमातही जाऊ शकते.
डेंग्यू एन्सेफलायटीसची न्यूरोलॉजिकल लक्षणं
- व्यक्तीची नर्व्हस सिस्टम पूर्णपणे डॅमेज होते.- व्यक्ती अनेक वेळा कोमातही जाऊ शकते.- व्यक्तीची विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती पूर्णपणे नष्ट होते.- माणसाच्या मेंदूमध्ये अनेक प्रकारच्या समस्या सुरू होतात.