Never Chew Food From One Side: अन्न चांगलं चावून खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण असं केल्याने पचनक्रिया चांगली होते आणि पोटासंबंधी समस्या होत नाहीत. बरेच लोक तोंडात एकाच बाजूने घास चावतात. पण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं. तोंडात एकाच बाजूने घास चावण्याची तुम्हाला सवय असेल तर ही सवय लगेच सोडण्याचा सल्ला दातांच्या डॉक्टरांनी दिला आहे.
प्रसिद्ध डेंटिस्ट डॉ. नियती अरोरा यांनी 'द इंडियन एक्सप्रेस'ला सांगितलं की, "मी कधीच कुणाला एकाच बाजूने चावून खाण्याचा सल्ला देणार नाही. हे नॉर्मल फिजियोलॉजिकल अॅक्टिविटीजच्या उलट आहे. ज्या दोन्ही जबड्यांनी अन्न चावण्यासाठी सिमिट्रिकली काम करतात".
एकाच बाजूने चावल्याने काय होतं?
डॉ. नियती यांनी सांगितलं की, "सगळ्यात आधी तुम्हाला असं जाणवेल की, ज्या बाजूचा तुम्ही जास्त वापर करता त्या बाजूचे दात जास्त घासले जातात. ज्या बाजूचा जास्त वापर केला जात नाही त्या बाजूने जास्त कॅलकुलस आणि टार्टर जमा होऊ लागतं. एका बाजूने जास्त डिपॉझिट जमा झाल्याने हिरड्यांची समस्या होते आणि बॅक्टेरिया जास्त वाढू शकतात. ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो".
ज्या बाजूने तुम्ही जास्त अन्न चावता त्या बाजूच्या मसल्स जास्त डेव्हलप होऊ शकतात, ज्यामुळे चेहऱ्याचा आकार एकसारखा दिसणार नाही. डॉक्टरांनी सांगितलं की, "याने टेम्पोरोमंडिबुलर जॉईंट्समध्ये असमान घर्षण होतं. जर नेहमीच असं केलं तर व्यक्तीच्या कानाजवळ वेदना, तोंड उघडणं आणि बंद करताना आवाज येणे अशा समस्या होऊ शकतात". अनेकदा तोंडात एका बाजूने वेदना होतात. अशात दुसऱ्या बाजूने अन्न चावावं लागतं. पण असं नेहमी करणं चुकीचं आहे.
अन्न चावण्याची योग्य पद्धत
डॉ. नियती यांच्यानुसार, "सामान्य काहीही खाल्लेलं चावण्यासाठी तोंडातील दोन्ही बाजूंचा वापर केला पाहिजे. तसेच अन्न हळूहळू चावून खाल्लं पाहिजे. दोन्ही बाजूने चावल्याने दातांवर जास्त दबाव पडत नाही आणि दातांचं घर्षणही कमी होतं. तसेच चावून खाल्ल्याने अन्न चांगलं पचतं आणि जबड्यांवर दबावही कमी पडतो.