आई-वडिल होण्यासारखं सुख नाही. प्रत्येक जोडप्यात हा क्षण कमालीचा हळवा असतो. अनेक जोडप्यांचे स्वप्न असते की आपल्याला गुटगुटीत बाळ व्हावे. पण काहीवेळा बाळ झाल्यानंतर जसे आईला डिप्रेशन येते तसेच वडिलांनाही येऊ शकते. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे. बाळाच्या पालनपोषणाची जबाबदारी जितकी आईची असते तितकीच वडिलांचीही असते. घरी बाळ आल्यावर जीवनशैलीत झालेला बदल, बाळाचे पालन पोषण आणि डॉक्टर, औषधांचा खर्च यात वडिलांनाही टेन्शन येतं. काहीवेळा हे टेन्शन डिप्रेशनमध्येही बदलू शकतं. काऊसिलिंग सायकॉलॉजीस्ट डॉ. नेहा आनंद यांनी ओन्ली माय हेल्थ शी बोलताना पुरुषांमध्ये पत्नीच्या बाळंतपणानंतर येणाऱ्या डिप्रेशनची काही लक्षणे सांगितली आहेत. ती अशी...
लक्षणेनेहमी उदास असणेवजन अचानक कमी किंवा जास्त होणेकामाचा ताण येणेचिडचिडेपणा व हृद्याचे ठोके वाढणेपत्नीशी बोलायची इच्छा न होणे
उपायमेडिटेशनमेडिटेशन करणे हा ताण घालवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. दिर्घ श्वास घ्या आणि सोडा. श्वासावर लक्ष केंद्रीत करा. जवळ जवळ ३० मिनिटे हे केल्याने तुम्हाला बराच फरक जाणवेल.
वडिल झालेल्या इतर मित्रांशी बोलाहाही एक सर्वोत्तम उपाय ठरु शकतो. आपण अनुभवातून शिकतो. त्यामुळे तुमच्या मित्रांचे अनुभव तुम्हाला या काळात आधार देतील. नवीन काहीतरी शिकवतील.
डाएटवर लक्ष द्याया काळात मिनरल्स आणि जीवनसत्वांनी युक्त आहार वाढवा. जास्तीतजास्त भाज्या खा. यामुळे तुमचे पॉझिटीव्ह हार्मोन्स उत्तम पद्धतीने तुम्हाला साथ देतील. लहानग्याला सांभाळताना जर रात्रीची झोप पूर्ण होत नसेल कर पाळी पाळीने कुणीतरी एक जण बाळाला सांभाळेल असे निश्चित करा.
वर्क आणि पर्सनल लाईफ वेगवेगळी कराआपली वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफ वेगळी ठेवा. सध्या वर्क फ्रॉम होम असल्याने बऱ्याच नव्या पालकांची चिडचिड होते. अशावेळी जबाबदाऱ्या वाटून घ्या.