शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

आॅफिस कल्चरसाठी ‘देसी साडी’ देई हटके लूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 11:00 AM

आॅफिस कल्चर मध्येही हळू हळू साडी ‘इन’ होताना दिसत आहे. त्यात देसी साडींची तर मोठी क्रेझच वाढत आहे.

आॅफिस म्हटलं की शिस्तबद्ध वातावरण, टार्गेट्स तर असतंच, शिवाय कामानिमित्त आपल्याला बाहेर ‘मिटींग्स’ साठी जावं लागतं. त्यासाठी आपली ड्रेसिंग सर्वात ‘बेस्ट’ असावी, असा आग्रह प्रत्येक स्त्रीचा असतोच. मुली सहसा फॉर्मल स्कर्ट आणि शर्ट, स्कार्फ अशा फॉर्मल ड्रेसिंगमध्ये आॅफिसमध्ये वावरतात. मात्र साडी हा सर्व मुलींचा ‘वीक पॉईंट’ आहे. कोणत्याही ओकेजनसाठी मुली सर्वात पहिले साडीलाच प्राधान्य देतात.आॅफिस कल्चर मध्येही हळू हळू साडी ‘इन’ होताना दिसत आहे. त्यात देसी साडींची तर मोठी क्रेझच वाढत आहे. * हॅन्डलूम साड्यांवरील नक्षीकाम म्हणजेच भारतीय कलासंस्कृतीचे दर्शन घडल्यासारखेच होय. या साड्या आपल्याला हव्या त्या डिझाईन्सने, रंगाच्या विणून घेऊ शकता, जसे की पाना-वेलींचे नक्षीकाम, वारली नक्षीकाम, किंवा आपल्याला हवे असेलेले नाव अशा अनेक डिझाईन्स सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या साड्या हाताने विणलेल्या असतात आणि म्हणूनच त्या दिसताना खूप आकर्षक वाटतात.  * सर्वात मोहक आणि नाजूक साड्यांच्या प्रकारामध्ये शिफॉन साड्या अग्रस्थानी आहेत. शिफॉन साडी आणि त्यावर हलकासा मेकअप करणा-या मुली आॅफिस मध्ये खास आकर्षण ठरतात. अनेक मुली शिफॉन पॅटर्न वजनाला हलके आणि विविध रंगांची सांगड या साड्यांमध्ये असल्या कारणाने मुली या साड्यांना पसंती देतात. * रेशमी साड्या या प्रत्येक वयोगटातील स्त्रीला आकर्षक वाटतात, शिवाय आॅफिसमध्ये अशीच सिल्क साडी कोणी नेसली तर त्या मुलीची हमखास प्रशंसा होतेच. रेशमी साड्यातून स्त्रीचं सौंदर्य अधिकचं खुलतं. एखाद्या कॉपोर्रेट मिटिंगमध्ये सिल्क साडी नेसून गेले तर त्या साडीत नक्कीच आपण ‘प्रेझेंटेबल’ दिसाल. * प्रत्येकाला आपल्या ‘कम्फर्ट झोन’ मध्ये राहायला आवडत असल्याने ‘आॅल टाइम बेस्ट’ राहण्यासाठी कॉटनचा पर्याय अवलंबु शकता. त्यातच हलक्या प्रिंटची कॉटन साडी आपल्याला एक वेगळा लूक देऊन जातो. कॉटन साडीवर जंक ज्वेलरी आणि साजेसा मेकअप आपल्याला सर्वांपेक्षा ‘कुल लूक’ देतो. फिक्या रंगाच्या कॉटन साड्या हादेखील उत्तम पर्याय आहे. * आॅफिस गोइंग मुलींसाठी लिनन पॅटर्न हा सर्वात कंफर्टेबल असा आॅप्शन आहे. साध्या तागापासून बनवलेल्या या साड्या आपला आॅफिस लूक अधिक आकर्षक बनवतात. या साड्यांवर आपण वेगवेगळे डिझाईनर ब्लाऊज परिधान करण्याचे प्रयोगदेखील करू शकतो. कारण लिनन साडी असा पॅटर्न आहे, जे आपण कोणत्याही ओकेजनवर अगदी बिनधास्तपणे परिधान करू शकतो.* वेस्टर्न आॅफिस लूक मध्ये आपल्याकडे फक्त दोन ते तीन एवढेच आॅप्शन आहेत पण इंडियन ड्रेसिंग स्टाईल मध्ये आपल्याला साड्यांचे विविध प्रकार मिळू शकतात, जे आपला आॅफिस लूक सर्वात हटके बनवण्यात आपली मदत करेल.