कर्नाटकातील बंगळुरूच्या अनेक डॉक्टरांनी न्यूरोसर्जरी क्षेत्रात एक खास यश मिळवलं आहे. या डॉक्टरांनी एक असं स्वदेशी डिवाइस तयार केलंय, ज्याच्या मदतीने छोट्यातली छोटी ब्रेन सर्जरी केली जाऊ शकते. ही एकप्रकारची स्टीरिओटॅक्टिक फ्रेम आहे. याला ३डीआर स्टीरिओटॅक्टिक सिस्टम असं नाव देण्यात आलं आहे.
स्टीरिओटॅक्टिक ब्रेन सर्जरी एक अशी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे मेंदूमध्ये झालेल्या ट्यूमरला एकतर काढलं जातं किंवा इमेज गाइडन्सच्या मदतीने त्याची बायोप्सी केली जाऊ शकते. याने मेंदूमध्ये क्लॉटिंग, मूव्हमेंट डिसऑर्डर, वेदना, साइट्स इत्यादी संबंधी समस्यांची सर्जरी करण्यास मदत मिळेल.
वेगळ्याप्रकारे डिझाइन करण्यात आलेल्या या फ्रेमला व्यक्तीच्या डोक्यावर सेट केलं जातं. याने सर्जरी करणारा डॉक्टर त्यांच्या गरजेनुसार मेंदूच्या वेगवेगळ्या आणि छोट्यातल्या छोट्या भागाला ऑपरेट करू शकतात. डिवाइसची कॉन्सेप्ट तयार करणाऱ्या आणि ब्रेन हॉस्पिटलच्या चेअरमन डॉ. एनके वेंकटरमन सांगतात की, 'या फ्रेमच्या शोधामुळे आम्ही मेंदूच्या कोणत्याही भागाला थ्रीडीमध्ये पाहून लोकेट करू शकतो आणि आवश्यक सर्जरी करू शकतो'.
हे डिवाइस बंगळुरूच्या महाल्सा मेडिकल टेक्नॉलॉजी लिमिटेडने तयार केली आहे. डॉ. वेंकटरमन पुढे सांगतात की, 'अशा अनेक फ्रेम मार्केटमध्ये आहेत पण त्यांच्या किंमती फार जास्त आहेत. आम्ही जे स्वदेशी थ्रीडी आर्क तयार केलंय. हे मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या फ्रेमपेक्षा तीन पटीने स्वस्त आहे'. या डिवाइसच्या लॉन्चवेळी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण सुद्धा उपस्थित होत्या. त्यांनी या टीमचं कौतुक केलं.
निर्मला सीतारमण म्हणाल्या की, 'जे लोक म्हणतात की, मेक इन इंडिया प्रगती करत नाहीये, त्यांनी हा शोध पहावा. हे बंगळुरूच्या लाइफ सायन्स रिसर्चर्स, डॉक्टर्स आणि उद्योगपतींचं शानदार कॉम्बिनेशन आहे. या डिवाइसमुळे अनेक रूग्णांना मदत मिळेल'.