बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र ८४ व्या वर्षीही निरोगी आणि फीट आहेत. त्यांची निरोगी शरीरयष्टी इतरांसाठी बर्यापैकी प्रेरणादायक आहे. या अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये ते निरोगी व सुरक्षित राहण्यासाठी आपल्या घरामध्ये वर्कआउट करताना दिसले आहेत. बरेच लोक वाढत्या वयात व्यायाम करण्यास सक्षम नसतात, परंतु वय फक्त एक संख्या आहे आणि प्रत्येकाने व्यायाम करायला हवा. हे धर्मेंद्र यांनी दाखवून दिले आहे.
स्टेशनरी बाईकवर व्यायाम करताना व्हिडिओ शेअर करताना ते म्हणाले की, ते दररोज आपल्या बाईकवर अर्धा तास व्यायाम करतात. निरोगी आणि फिट राहण्यासाठी नियमित व्यायाम करण्यासाठी ते आपल्या फॉलोअर्सना प्रोत्साहित करतात.
रोगप्रतिकारकशक्तीसाठी व्यायाम उत्तम
दररोज व्यायामाद्वारे चयापचय क्रिया व्यवस्थित राहते आणि रोगप्रतिकारक यंत्रणा रीचार्ज होते. जेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा योग्य प्रकारे कार्य करते, तेव्हा संसर्ग रोखला जातो. या व्यतिरिक्त, रोगांपासून लवकर मुक्त होण्यास मदत होते. या अभ्यासात असे दिसून आले आहे की नियमित व्यायामामुळे फुफ्फुसातील विषारी पदार्थ आणि बॅक्टेरिया उत्सर्जित होतात. एवढेच नव्हे तर व्यायामामुळे स्ट्रेस हार्मोनचा स्तर स्राव कमी होतो आणि शरीर निरोगी राहते. शिळे झाल्यानंतर चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन; उरलेलं अन्न खाणं ठरू शकतं घातक
स्टेशनरी बाईक चे फायदे
धर्मेंद्र आपल्या होम जिममध्ये स्टेशनरी बाईक वर वर्कआउट करताना दिसले. वास्तविक, स्टेशनरी बाईक घरात ठेवणे फायद्याचे आहे. कधीकधी वेळ नसल्यामुळे आणि व्यस्त वेळापत्रकांमुळे जिममध्ये जाणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत घरी स्टेशनरी बाईकवर वर्कआउट करून फिटनेस ठेवता येऊ शकतो. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व वयोगटातील लोक स्टेशनरी बाईकवर वर्कआउट करू शकतात.
जॉगिंग, योग, एरोबिक, कार्डिओ आणि इतर सर्व प्रकारच्या व्यायामामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. ४० ते ५० मिनिटे शारीरिकरित्या सक्रिय राहिल्यास निरोगी राहण्यास मदत होते. बर्याच होम वर्कआउट्स आणि व्हिडिओ निरोगी जीवनशैली टिकवून ठेवण्यास मदत करतात. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते
हे मजबूत स्नायूंसाठी फायदेशीर आहे. या बाईकवर ३०-४० मिनिटांचा व्यायाम केल्यास ८०-१०० कॅलरी जळतात.
स्टेशनरी बाईक चालविण्यामुळे मेंदू, फुफ्फुसं आणि हृदय निरोगी राहते. मधुमेहाचे रुग्णही या बाईकवर कसरत करू शकतात.
याव्यतिरिक्त गुडघे आणि मागच्या भागाभोवती स्नायू मजबूत असतात. हे शरीर संतुलित राखण्यास मदत करते. कोरोना व्हायरसमुळे पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम?; नवीन संशोधनातून खुलासा