शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

मधुमेह आणि डिमेन्शियाचे समिकरण रुग्णासाठी घातक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 4:42 PM

हायपोग्लासिमिया टाळण्यासाठी रुग्णांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. ज्येष्ठ नागरिकांना डिमेन्शिया आणि मधुमेहाचा मोठा धोका असतो.

मुंबई- मधुमेह आणि डिमेन्शिया हे दोन्ही आजार एकाचवेळेस असणाऱ्या रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यापासून ते थेट मृत्यूपर्यंत धोका संभवतो अशी भीती नव्या अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे. या अभ्यासात ६५ आणि ६५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या टाइप-१, टाइप-२  हे मधुमेह असणाऱ्या २०,००० व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता, तसेच या लोकांच्या रक्ताची पातळी पहिल्यांदा खालावण्याच्या प्रसंग नोंदवल्यानंतर त्यांचे निरीक्षण करण्यात आले. ज्या लोकांना मधुमेह आणि डिमेन्शिया हे दोन्ही आजार असणाºयांना केवळ मधुमेह असणाºया लोकांपेक्षा हायपोग्लासिमिया (रक्तातील साखरेची पातळी घसरणे)मुळे मृत्यूचा धोका ६७ टक्के जास्त धोका असल्याचे निरीक्षणात लक्षात आले.     हायपोग्लासिमिया हा मधुमेह आणि डिमेन्शिया असणाऱ्या ज्येष्ठांच्या मृत्यूच्या न ओळखल्या गेलेल्या कारणांपैकी एक असल्याचे मत या अभ्यासाच्या लेखिका डॉ. कॅथरिना मॅटिशेंट यांनी व्यक्त केले. त्या इंग्लंडमधील नॉर्विच मेडिकल स्कूल येथे कार्यरत आहेत. या प्रकारच्या रुग्णांनी साखर कमी करण्याच्या लक्ष्यांना दूर ठेवून ग्लुकोज मॉनिटरच्या मदतीने हायपोग्लासिमियाचे निदान करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे डॉ. कॅथरिना यांनी अभ्यासानंतर निरीक्षण मांडले.     बर्लिन येथे झालेल्या युरोपियन असोसिएशन फॉर स्टडी आॅफ डायबेटिसच्या वार्षिक बैठकीमध्ये या अभ्यासावर आधारित शोधनिबंध वाचून दाखवण्यात आला. डिमेन्शियाचा धोका कमी करणे, रुग्णाची अधिकाधिक काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे. डिमेन्शिया वाढण्यासाठी डायबेटिस कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे या दोन्ही आजारांचा एकमेकांशी संबंध जाणून घेण्यासाठी लवकरात लवकर त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे असे मत अल्झायमर सोसायटीचे संशोधन प्रमुख जेम्स पिकेट यांनी मांडले आहे. डायबेटिस असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या रक्तातील साखर कमी होणे धोकादायकच आहे आणि जर त्या व्यक्तीला डिमेन्शिया असेल तर ते आणखीच धोकादायक असेही पिकेट म्हणाले. रक्तातील साखरेची पातळी घटण्याचा विचार करता त्यावर काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे असे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यdiabetesमधुमेह