Dragon Fruit for Diabetes Control: डायबिटीस आजच्या लाइफस्टाईलमध्ये वेगाने वाढणारा आजार झाला आहे. भारतात कोट्यावधी लोक या आजाराचे शिकार झाले आहेत. कमी वयाच्या लोकांनाही हा आजार होत आहे. जर हा आजार एकदा झाला तर आयुष्यभर दूर होत नाही. कारण यावर ठोस असा काहीच उपाय नाही. पण याला कंट्रोल करता येतं. अनेक लोक ड्रॅगन फ्रूटला डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी प्रभावी मानतात. पण खरंच असं होतं का?
ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit for Diabetes Control) एक असं फळ आहे जे सामान्यपणे लोक सलाद म्हणून किंवा शेक बनवून सेवन करतात. हे एक कॅक्टस प्रजातीचं फळ आहे. याला होनोलूलू क्वीन नावानेही ओळखलं जातं. हिलोसेरियस कॅक्टसवर उगवणारे ड्रॅगन फ्रूटचे फूल केवळ रात्री उमलतात. असं म्हटलं जातं की, या फळाच्या वापराने शरीरातील हाय ब्लड शुगर संतुलित होते.
इन्सुलिन बनवण्यास मिळते मदत
एक स्टडीनुसार, ड्रॅगन फ्रूटमध्ये डायबिटीसला कंट्रोल करणारे तत्व आहेत. यात भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम असतं. जे शरीरात इन्सुलिन तयार करण्यास मदत करतं. इन्सुलिन तयार झाल्यावर डायबिटीस आपोआप कंट्रोल होऊ लागतो.
रिसर्चनुसार, ड्रॅगन फ्रूटची टेस्ट थोडी तिखट असते. याचं कारण यात असलेले भरपूर पोषक तत्व आहेत. याचं सेवन डायबिटीसमध्ये करणं फार फायदेशीर मानलं जातं. ब्लड शुगरच्या रूग्णांना डॉक्टर हे फळ खाण्याचा सल्ला देतात. हे फळ पांढरं, गुलाबी, पिवळा आणि लाल रंगात मिळतं. यात अॅंटी-ऑक्सिडेंटही भरपूर असतात. प्री-डायबिटीक म्हणजे ब्लड शुगरच्या पहिल्या स्टेजमधील रूग्णांसाठी ड्रॅगन फ्रूटचं सेवन फार फायदेशीर मानलं जातं.