शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

डायबिटीस वाढण्याआधी 'अशी' घ्या काळजी, नाहीतर पडू शकतं महागात 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 11:13 AM

सध्याच्या खाण्यापिण्याच्या बदलेल्या सवयींमुळे आणि राहण्याच्या पध्दतींमुळे सगळ्यात वयात आजारांचे प्रमाण वाढलेलं दिसून येतं.  

सध्याच्या खाण्यापिण्याच्या बदलेल्या सवयींमुळे आणि राहण्याच्या पध्दतींमुळे सगळ्याच वयात आजारांचे प्रमाण वाढलेलं दिसून येतं.  आधीच्या काळात जे आजार मोठ्या  किंवा वयस्कर वयोगटात दिसून यायचे ते आजार सध्याच्या लहान मुलांमध्ये तसंच तरूणांमध्ये सुद्धा जास्त दिसून येतात. पण जेव्हा  तुम्हाला असलेल्या आजारांची तीव्रता कमी असते. तेव्हा  काही त्रास होत नाही पण हेच आजार जास्त प्रमाणात उद्भवल्यास जीवाला धोका उद्भवू शकतो.

डायबिटीस सारख्या आजारांवर नियंत्रण मिळवायचं असल्यास काही गोष्टींची काळजी घेणं गरचेचं असतं. जर तुम्हाला डायबिटीस असेल तर शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी पोषक आणि संतुलीत आहार घेणं गरजेचं आहे. तसंच काही पदार्थ आहारातून टाळणं शरीरासाठी लाभदायक ठरत असतं. चला तर मग जाणून घेऊया कोणते पदार्थ आहारातून वगळल्यास डाटबिटीस नियंत्रणात राहील. 

ड्राय फ्रूटपासून लांब रहा

 डायबिटिस वाढू नये यासाठी ड्राट फ्रूट्सचा समावेश आहारात नसणे फायद्याचे ठरते. जर तुम्ही उपाशी पोटी ड्राय फ्रूट्स खाल्ले तर शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ड्राय फ्रूटपासून  लांब राहील्यास फायदेशीर ठरेल. 

वजन वाढू देऊ नका

डायबिटीस टाळण्याकरता वजन आटोक्यात ठेवणे आवश्यक आहे. खूप गोड खाल्ले की मधुमेह होतो हा चुकीचा समज आहे. गोड खाऊन मधुमेह होत नाही- पण खूप गोड पदार्थ खाल्ले की वजन वाढते, पोटावरची चरबी वाढते व डायबिटीस त्यामुळे होण्याची शक्यता वाढते. जेव्हा तुम्हाला जास्त भूक लागते तेव्हा पटापट आणि प्रमाणापेक्षा जास्त खाणं टाळा. कारण त्यामुळे डायबिटीस वाढू शकतो. म्हणून काही प्रमाणात पोटात  रिकामी जागा ठेवून आहार घ्या. ( हे पण वाचा:पायांच्या रोजच्या दुखण्याला जबाबदार आहे 'हा' आजार, वेळीच व्हा सावध)

सॅचुरेटेड फॅट आहारात नको

जर तुम्ही आहारात मासांहाराचा समावेश जास्त प्रमाणात करत असाल तर त्यामुळे कॉलेस्ट्रॉल वाढून हृदयासंबंधी आजार वाढण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे आहारात मासांहाराचा समावेश नसणे फायद्याचे ठरेल. 

आवळ्याचा समावेश

आवळ्यानेही डायबिटीस नियंत्रित आणता येतो. आवळ्यामुळे शरीरातील व्हिटॉमिन सी ची कमतरता भरून काढली जाते. एक चमचा आवळ्याच्या रसात कारल्याचा रस मिसळून रोज प्या. त्यामुळे डायबिटीस कमी प्रमाणात राहील.

नियमीत व्यायाम 

जर तुम्हाला तुमच्या  शरीरातील डायबिटीजचे प्रमाण कमी करायचे असेल तर तुम्ही दररोज सकाळी चालायला जायला हवं असं केल्यास फायदेशीर ठरेल. तसंच व्यायाम करणं सुध्दा गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं हृदय चांगले राहीलं तसंच रक्तप्रवाह नियंत्रणात राहील. तसंच बदलत्या ऋतूनुसार आहारात ताज्या भाज्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. त्यासाठी डाएट चार्ट स्वतः तयार करून त्याप्रमाणे आहार घेणं फायदेशीर ठरेल. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य