सध्या लहान मुलांपासून अगदी थोरामोठ्यांपर्यंत अनेक लोक डायबिटीजच्या समस्येने ग्रस्त आहेत. पण डायबिटीसबाबत बोलताना अनेकदा 'डायबिटीस मेलिटस' असा उल्लेख करण्यात येतो, पण तुम्हाला माहीत आहे का? नक्की डायबिटीज मेलिटस आहे तरी काय? अनेक लोक याबाबत विचारणाही करतात. खरं तर डायबिटीस मेलिटस हा मेटाबॉलिज्म संबंधातील अनेक आजारांच्या समूहाचं नाव आहे. डायबिटीस मेलिटस (diabetes mellitus) ला डीएम (DM) या नावानेही ओळखलं जातं. डायबिटीस मेलिटस हा आजार रक्तातील साखरेच्या पातळीशी संबंधित आहे. सामान्य शब्दांमध्ये ज्या आजाराला लोक डायबिटीस असचं म्हणतात. पण यामध्ये सर्व प्रकारच्या डायबिटीसचा समावेश होतो. टाइप 1, टाइप 2 डायबिटीस, गर्भावधी डायबिटीस आणि सेकेंडरी डायबिटीस मुख्य स्वरूपात डायबिटीस मेलिटसचे प्रकार आहेत.
डायबिटीस मेलिटसचे प्रकार...
- टाइप 1 डायबिटीस
- टाइप 2 डायबिटीस
- गर्भावधि डायबिटीस
- सेकेंडरी डायबिटीस
डायबिटीस आणि डायबिटीस मेलिटसमध्ये फारसं अंतर नाही. डायबिटीस एक प्रकारे आजारांच्या समुहाला व्यवस्थित सांगू शकत नाही. डायबिटीस मेलिटसमध्ये सर्व प्रकारच्या ब्लड शुगर संबंधातील आजारांचा समावेश होतो.
ज्या व्यक्ती डायबिटीज मेलिटसच्या समस्यांनी ग्रस्त असतो. त्यांनी त्वरित उपचार करणं आवश्यक असतं. जर डायबिटीस मेलिटसवर उपचार केले नाहीतर यामुळे अनेक जीवघेण्या लक्षणांचा सामना करावा लागू शकतो.
डायबिटीस मेलिटसमुळे उद्भवणाऱ्या समस्या...
- डायबिटीस केटोएसिडोसिस
- नॉनकेटोटिक हायपरोस्मोलर कोमा किंवा मृत्यू
- हृदय रोगांचं कारण
- स्ट्रोकचा धोका वाढतो
- क्रोनिक किडनी डिजीज
- पायांना अल्सर होणं
- डोळ्यांच्या समस्या उद्भवणं
डायबिटीस मेलिटसची समस्या उद्भवल्याने शरीरामध्ये मुबलक प्रमाणात इन्सुलिन उत्पादन करू शकत नाही. शरीराच्या पेशींमध्ये इन्सुलिनचा प्रवाह सुरळीत होत नाही. तसेच इन्सुलिन निर्मितीमध्येही अडथळे निर्माण होतात.
डायबिटीज मेलिटसची लक्षणं...
- सतत तहान लागणं
- सतत लघवी होणं
- सतत भूक लागणं
- डोळ्यांची दृष्टी कमी होणं
- शरीरात थकवा जाणवणं
- अचानक वजन कमी होणं
- जखम ठिक होण्यास वेळ लागणं
- यूरिन इन्फेक्शन होणं
- सतत डोकं दुखणं
टाइप 1 डायबिटीस कोणत्याही व्यक्तीला अचानक होऊ शकतं. आतापर्यंत टाइप 1 डायबिटीस होण्याचं कारण समजू शकलेलं नाही. टाइप 2 डायबिटीस अनेकांमद्ये आढळून येतो. पण जर यावर लक्ष दिलं तर यापासून बचाव करणं शक्य होतं. गर्भावस्थेतील डायबिटीस आहारात आणि औषधांच्या सेवनाने उपचार करू शकता. सेकेंडरी डायबिटीस अचानक होतो आणि अचानक ठिकही होतो.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.)