(Image Credit : medicalxpress.com)
डायबिटीसचा आजार हा एक मेटाबॉलिक डिसऑर्डरचा आजार आहे. वैश्विक स्तरावर पाहिलं तर टाइप २ डायबिटीस जास्त प्रमाणात वाढत आहे. डायबिटीस हा आजार इन्सुलिन कमी झाल्या कारणाने होतो. पण जिनेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, केवळ इन्सुलिन कमी असल्याने डायबिटीस हा आजार होतो असं नाही. डायबिटीस फॅटी लिव्हरमुळेही होऊ शकतो.
oद हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, अभ्यासकांनुसार, लठ्ठपणा आणि फॅटी लिव्हरमुळे इन्सुलिनची कमतरता होते. फॅटी लिव्हरमुळे हार्मोन्समध्ये जे बदल होतात, त्याने ग्लूकोज जास्त तयार होतं. ग्लूकोजच्या अधिक निर्मितीमुळे टाइप २ डायबिटीसचा धोका अधिक वाढत असतो. याचा संबंध कोणत्या हार्मोनल बदलाशी सुद्धा नाही. हा रिसर्च बायोलॉजिकल केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
फॅटी लिव्हरमुळे डायबिटीसचा धोका का?
(Image Credit : health.harvard.edu)
रक्तात ग्लूकोजचं प्रमाण दोन विरोधी हार्मोन द्वारे नियंत्रित केलं जातं. हार्मोन इन्सुलिन ब्लड शुगरचं प्रमाण कमी करतं आणि हार्मोन ग्लूकागन याला वाढवतं. हृदय या दोन हार्मोनच्या प्रभावात ग्लूकोजची निर्मिती आणि पुर्नवितरण करून ब्लड शुगरचं प्रमाण नियंत्रित करतं. लठ्ठ लोकांमध्ये इन्सुलिनमध्ये अडथळा निर्माण होण्याचा धोका असतो आणि त्यांच्यात यकृत पेशींमध्ये चरबी जमा करण्याची प्रवृत्ती देखील असते. याने लिव्हरध्ये फॅट लिव्हरची समस्या निर्माण होते.
अभ्यासकांचं मत आहे की, या परिवर्तनांचा मायटोकॉन्ड्रिअल फंक्शनवर प्रभाव पडू शकतो. रिसर्चमध्ये त्यांनी यकृत पेशी मायटोकॉन्ड्रिया, लठ्ठपणा आणि मधुमेह यांच्यात संबंध शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी OPA1 नावाच्या प्रोटीनवर लक्ष केंद्रीत केलं. ज्याने मायटोकॉन्ड्रियाची संरचना कायम ठेवली जाते.