नवी दिल्ली : मधुमेहाचा (diabetes) आजार हळूहळू मानवी शरीराला पोकळ बनवतो, त्यामुळे त्याला सायलेंट किलर म्हणतात. तज्ज्ञांनी लोकांना इशारा दिला आहे की, 2030 पर्यंत 10 पैकी एक व्यक्ती मधुमेहाचा रुग्ण असू शकतो. चॅरिटी डायबिटीस यूकेचा दावा आहे की, लठ्ठपणाची वाढती पातळी पाहता, एका दशकात सुमारे 55 लाख लोक या रोगामुळे प्रभावित होतील, जे आज 49 लाखांपेक्षा जास्त आहेत.
रिपोर्टनुसार, 17 लाख लोकांमध्ये वाढत्या वजनामुळे टाइप -2 मधुमेहाचा धोका वाढेल. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस एस्क्यू म्हणाले, "आम्ही सध्या पब्लिक हेल्थ इमर्जन्सीच्या टिपिंग पॉईंटवर आहोत आणि ते थांबवण्यासाठी आम्हाला त्वरीत काहीतरी करावे लागेल. तसेच, यावर गांभीर्य दाखवत ख्रिस एस्क्यू यांनी सांगितले की, जर हे थांबवण्याचा प्रयत्न केला नाही तर लाखो लोक टाईप -२ मधुमेहाला बळी पडतील.
तज्ज्ञांनी सांगितले, 'योग्य काळजी आणि पाठिंब्याने मधुमेहाचे धोके टाळता येतात. टाइप -2 मधुमेहाच्या बाबतीत, दिलासा दिला जाऊ शकतो किंवा रोग पूर्णपणे टाळता येतो. रिपोर्टनुसार, टाइप -2 मधुमेहाची जवळपास 90 टक्के प्रकरणे अस्वस्थ जीवनशैलीमुळे होतात. तसेच, मधुमेह टाइप- 1 साठी कोणताही उपचार नाही.
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी, संस्थेने सरकारला वजन कमी करण्याचे कार्यक्रम, मधुमेहापासून बचाव आणि लक्षणे टाळण्यासाठी तपासणीमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. यूकेमधील दोन तृतीयांश लोक जास्त वजनाच्या समस्येने ग्रस्त आहेत. दरम्यान, NHS आधीच येथे जगातील सर्वात मोठा टाइप -2 मधुमेह प्रतिबंध कार्यक्रम चालवत आहे.
मधुमेहाची कारणे...व्यस्त जीवनशैली, जंक फूडचा जास्त वापर, थंड पेये आणि खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी यामुळे मधुमेह होऊ शकतो. जर एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसेल किंवा लठ्ठ असेल तर त्याचे वजन सामान्यपेक्षा जास्त असेल, तरीही मधुमेहाची शक्यता वाढते. पोटावर जास्त चरबी जमा झाल्यामुळे इन्सुलिन निर्मितीमध्ये अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे टाईप- 2 मधुमेह होऊ शकतो.