सध्याच्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे लोकांमध्ये लठ्ठपणा (Obesity) वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. त्यामुळे डायबिटीस(Diabetes) आणि कोलेस्ट्रॉल (Cholesterol) ची समस्याही होते. डायबिटीसमुळे शरीरात ब्लड शुगरचं लेव्हल वाढू लागते. अशात ही लेव्हल कंट्रोल करणं फार गरजेचं असतं.
काय आहे उपाय?
ग्लूकोज शरीराला एनर्जी देण्याचं काम करते. जी आपल्याला खाण्या-पिण्यातून मिळते. पण डायबिटीसच्या रूग्णांमध्ये इन्सुलिनची कमतरता असल्याने कोशिकांना ग्लूकोज मिळून शकत नाही आणि ते आपल्या रक्तात जमा होऊ लागतं.
एक्सपर्ट्सनुसार, आपल्या प्रत्येकाच्या घरात एक अशी वस्तू आहे जी खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल होऊ शकते.नायजेरियाच्या डेल्टा स्टेट यूनिव्हर्सिटीतील वैज्ञानिक एंथनी ओजीह यांनी सांगितलं की, कांद्यात (Onion) अनेक प्रकारचे न्यूट्रिएंट्स असतात ज्याने डायबिटीसच्या रूग्णांवर उपचार शक्य आहे.
रिसर्चमधून मोठा खुलासा
एका रिसर्चनुसार, उंदारांच्या तीन वेगवेगळ्या ग्रुपवर कांद्याच्या रसाच्या डोसची टेस्ट करण्यात आली. त्यांना दररोज ४०० आणि ६०० मिली ग्रॅम रस देण्यात आला. यानंतर त्यांची ब्लड शुगर लेव्हल टेस्ट करण्यात आली. तेव्हा आढळलं की, शुगर लेव्हल ४० ते ३५ टक्के कमी झाली.
कांदा खास कसा?
एंथनी ओजीह यांनी सांगितलं की, त्यांनी असं पद्धत टेस्ट केली ज्याच्या माध्यमातून कांद्याच्या मदतीने ब्लड शुगर लेव्हल कमी केली जाऊ शकते. कांद्यात आढळणाऱ्या सल्फर आणि क्वेरसेटिनच्या माध्यमातून असं होतं. या दोन्हींमध्ये डायबिटीस कमी करण्याचे तत्व आढळतात.
क्वेरसेटिन एक फ्लेवोनॉइड आहे ज्याला तुम्ही डेली डाएटमध्ये घेऊ शकता. त्यासोबतच सल्फरच्या मदतीने कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल केली जाऊ शकते.
हृदयरोगात फायदेशीर - रिसर्चमधून आढळलं की, भाज्यांमध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी तत्व आढळतात. ज्याने शरीरात हाय ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत मिळते. ज्या लोकांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी कांद्याचं नियमित सेवन करावं. कांदा हा हार्टच्या रूग्णांसाठी संजीवनीसारखं काम करतो.