कोरोना व्हायरसच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने पुन्हा एकदा लोकांच्या मनात दहशत निर्माण केली आहे. ओमायक्रॉन संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, तज्ज्ञांनी लोकांना लवकरात लवकर लस घेण्याचा सल्ला दिला आहे. लस घेतल्याने तुम्हाला टी-सेल रोगप्रतिकारशक्ती कुठे मिळेल, तर पौष्टिक गोष्टी खाल्ल्याने नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमध्ये मधुमेह आणि रक्तदाब यासारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअर आणि स्लीप मेडिसिन विभागातील श्वसनविषयक सल्लागार डॉ. विनी कंत्रू यूट्यूबवरील सेशनमध्ये म्हणाले, “मधुमेहाच्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यांना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवावी लागते. अशा लोकांना डॉक्टरांशी संपर्क साधणं, इन्सुलिन घेणं आणि लसीकरण करणं आवश्यक आहे.
कोविड-19 संसर्गाच्या बाबतीत, लठ्ठपणामुळेही गंभीर लक्षणं दिसू शकतात. लठ्ठपणा आणि मधुमेह यांचं मिश्रण खूप धोकादायक आहे. डॉ. कंत्रू सल्ला देतात की, "मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांनी त्यांचं वजन नियमितपणे तपासत राहावं. लठ्ठ असणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. अशा लोकांना कोविड-19 या गंभीर आजारात जास्त त्रास होतो. तुमचं वजन जास्त असेल तर तुम्हाला कोरोनाची लागण होण्याची शक्यताही जास्त असते."
अँटिऑक्सिडंटने भरपूर असलेला आहार विषाणू किंवा संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी खूप प्रभावी आहे. डॉ.कंत्रू म्हणाले, "आपण आपल्या आहारात बदाम, फळं किंवा सॅलडमधून अँटिऑक्सिडंट्सचा समावेश करू शकतो. अँटिऑक्सिडंट्स शरीराला डीएनएच्या नुकसानापासून वाचवतात." तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, दररोज सुमारे 30 ग्रॅम बदाम खाल्ल्याने मुलांमध्ये आणि प्रौढांमधील संसर्ग आणि रोगांचा धोका कमी होतो.