डायबिटीज एक सामान्य समस्या आहे. देशात ७० मिलियन लोक या आजारानं पीडित आहेत. भारताला जगभरातील डायबिटीसची राजधानी म्हटलं जात आहे. खाण्यापिणंआणि लाईफस्टाईलशी निगडीत हा आजार आहे. हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एंड प्रिवेंशनं (सीडीसी) दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही प्रीडायबेटिक असाल तर जीवनशैलीत बदल करून तुम्ही टाईप २ डायबिटीज होण्याचा धोका कमी होऊ शकतो. खराब जीवनशैली व्यतिरिक्त अन्य काही कारणांमुळे या आजाराचा धोका वाढतो.
नॉन-O ब्लड टाइपचे लोक होऊ शकतात डायबिटिसचे शिकार
युरोपियन असोसिएशनच्या डायबेटोलोजिया या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या 2019 च्या अभ्यासानुसार, O-ब्लड ग्रुप असलेल्या लोकांच्या तुलनेत नॉन-O ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना टाइप 2 डायबिटीस होण्याचा धोका जास्त असतो.
अभ्यास काय सांगतो?
80,000 महिलांवर केलेल्या अभ्यासात ब्लड ग्रुप आणि टाइप 2 डायबिटीसचा धोका यांच्यातील संबंध आढळून आला. यापैकी 3553 लोकांना टाइप 2 डायबिटीस आढळून आला आणि नॉन-ओ प्रकारचा ब्लड ग्रुप असलेल्यांना डायबिटीस होण्याचा धोका जास्त होता.
बी ब्लड ग्रुपच्या लोकांमध्ये जास्त जोखिम
अभ्यासानुसार, ए ब्लड ग्रुप असणाऱ्या महिलांमध्ये ओ ब्लड ग्रुपच्या स्त्रियांपेक्षा टाइप 2 डायबिटीस होण्याची शक्यता 10 टक्के जास्त आहे. ओ ब्लड ग्रुपच्या महिलांच्या तुलनेत बी ब्लड ब्लड ग्रुपच्या महिलांमध्ये मधुमेह होण्याची शक्यता 21 टक्के जास्त आहे.दरम्यान युनिर्व्हर्सल डोनर ओ निगेटिव्हची प्रत्येक कॉम्बिनेशनसह तुलना केल्यानंतर बी पॉझिटिव्ह रक्तगटाच्या महिलांमध्ये टाईप २ डायबिटिस विकसित होण्याची जोखिम जास्त असते. आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा
बी रक्तगटाच्या लोकांमध्ये जास्त जोखिम का असते?
संशोधकांच्यामते डायबिटीसची जोखिम आणि रक्ताच्या गटाच्या प्रकारातील संबंध अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही. अभ्यासानुसार नॉन ओ रक्तगटातील लोकांमध्ये नॉन-वीलब्रँड फॅक्टर जास्त असतो. त्याचा संबंध साखरेच्या वाढत्या स्तराशी असतो. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार रक्त वेगवेगळ्या प्रकारच्या अणूंशी जोडलेले असते. त्यामुळे डायबिटीस होण्याचा धोका वाढतो.
जर एखाद्या व्यक्तीस टाइप 2 डायबिटीसचा त्रास होत असेल तर, ते शरीरात साखर नियंत्रित करण्याच्या आणि वापरण्याच्या मार्गावर परिणाम करते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते, वेळेवर उपचार न केल्यास ते खूप धोकादायक ठरू शकते. म्हणून वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन जीवनशैली सुधारणं योग्य पर्याय ठरेल.