डायबिटीस दोन प्रकारचा असतो टाईप १ आणि टाईप २. दोन्ही डायबिटीसमध्ये प्रकारामध्ये शरारीतील इन्शुलीनच्या प्रमाणामध्ये अनियमितता दिसून येते. यामध्ये ९० टक्के लोकांना टाईप २ डायबिटीस असतो. डायबिटीसची लक्षणं वेळीच ओळखल्यामुळे त्याचा इलाज करणं शक्य होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हातांवरही डायबिटीसची लक्षणं दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती?
डायबिटीसची लक्षणं सर्वप्रथम बोटांवर दिसू लागतात. बोटांची त्वचा लालसर दिसू लागते, नखाच्या बाजूच्या त्वचेच्या खपल्या पडू लागतात. काहीवेळा त्यातून रक्तही येते. त्याचबरोबर नखांमध्ये व आजूबाजूला रक्ताभिसरण कमी होते. त्यामुळे नखं पिवळी दिसू लागतात. तुटतात. ही लक्षणं जर दिसत असतील तर तुम्हाला डायबिटीस असण्याची शक्यता आहे.
तुम्हाला रात्री वारंवार मुत्रविर्सजन होत असेल. तर हेही डायबिटीसचेच लक्षण आहे. कारण तुमच्या शरीरात जास्त साखर असते आणि ती बाहेर काढण्यासाठी वारंवार युरिन होते. तसेच तुम्हाला वारंवार तहानही लागते. शरीर डिहायड्रेट होत असल्यामुळे सतत थकवा येतो. तसेच तुमचं वजन जास्त असणं, ४० नंतरही डायबिटीस होण्याच्या शक्यतेत वाढ होते.
जर तुम्हाला यातील कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर डायबिटीसच्या शक्यतेत वाढ होऊ शकते. त्यामुळे त्वरित तज्ज्ञांना भेटा व त्यांचा सल्ला घ्या.