Blood Sugar Control: भारतात डायबिटीस कोट्यावधी रूग्ण आहेत. अशात तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की, जेव्हा शुगरची लेव्हल वाढते, तेव्हा रूग्णाच्या शरीरात कशा प्रकारचे दिसण सुरू होतात. जेव्हा शरीरात ब्लड शुगर वाढते तेव्हा आपलं शरीर अनेक संकेत देतं. जसे की, अचानक वजन कमी होणे. त्याशिवाय पुन्हा पुन्हा लघवी येणे. नजर कमजोर होणे आणि पायांमध्ये काही बदल दिसू लागतात. याने नर्व सिस्टम डॅमेज होण्याशिवाय ब्लड सर्कुलेशनमध्येही समस्या होते.
पायांवर दिसतात ही लक्षण
डायबिटीसमुळे पायांनाही फटका बसतो. याने नर्व सिस्टम डॅमेज होते आणि ब्लड सर्कुलेशनही व्यवस्थित होत नाही. जेव्हा एखाद्या रूग्णाची नर्व सिस्टम डॅमेज होते, तेव्हा त्यांना पायांमध्ये कशाचीही जाणीव होत नाही. तेच जर ब्लड सर्कुलेशनमध्ये समस्या झाली तर इतरही अनेक समस्या होतात. यामुळे कोणतंही संक्रमण ठीक करण्यास अडचण येते. जर तुम्ही यावर वेळीच उपचार केले नाही तर शरीरातील इतरही अवयव खराब होऊ शकतात.
डोळ्यांमध्ये होतो बदल
जेव्हा शरीरात ब्लड शुगर लेव्हल वाढते तेव्हा डोळ्यांच्या रेटिनाच्या रक्तवाहिका प्रभावित होतात. जर असं झालं तर डोळ्यांसंबंधी इतरही समस्या होऊ शकतात. जसे की, तुमची नजर कमजोर होणं, धुसर दिसणं, मोतिबिंदू, ग्लूकोमा. त्याशिवाय रेटिनोपॅथीही होऊ शकते. हा एक रेटिनासंबंधी आजार आहे. यात डोळ्यांच्या मागच्या थरामध्ये समस्या होते. जर यावर वेळीच उपचार केले नाही तर डोळ्यांची दृष्टीही जाते.
हिरड्या होता खराब
जेव्हा शुगर लेव्हल वाढते तेव्हा हिरड्याही खराब होतात. याला पेरियोडोंटल डिजीज असंही म्हणतात. यात रक्तवाहिना बंद किंवा जाड होतात. ज्यामुळे हिरड्यामध्ये रक्त प्रवाह कमी होतो. हाय ब्लड शुगर झाल्यावर तोंडात बॅक्टेरियाही वाढतो.