Diabetes symptoms : सध्याच्या स्थितीत डायबिटीसने पीडित रूग्णांपैकी 90 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना टाइप 2 डायबिटीस आहे. सुरूवातीच्या संकेतांबाबत अनेकांना माहिती नसल्याने अनेकदा यावर उपचार घेतले जात नाहीत. फार जास्त थकवा जाणवणे किंवा वजन कमी होणे यासारखे संकेतही डायबिटीसमुळे दिसू शकतात. नुकतंच एका एक्सपर्टने अशा लक्षणाबाबत सांगितलं जो केवळ रात्रीच दिसतो.
ऑनलाईन 'द व्हॉईस ऑफ डायबिटीस' म्हणून ओळखली जाणारी डायना बायटिकीने नुकतंच एका व्हिडिओत सांगितलं की, रात्री पाय किंवा बोटांमध्ये होणारी जळजळ, वेदना, सुन्नता किंवा झिणझिण्या डायबिटीस न्यूरोपॅथीचा संकेत आहे. या स्थितीने नर्व्सना नुकसानही पोहोचू शकतं.
डायना बायटिकी म्हणाली की, जळजळ, वेदना, सुन्नता किंवा झिणझिण्या सामान्यपणे पायांच्या बोटांपासून सुरू होते आणि हळूहळू वाढत जाते. स्थिती वाढली तर याचा प्रभाव हातांवरही बघायला मिळतो आणि त्या अवयवांना स्पर्श केल्यास वेदना होतात.
ती पुढे म्हणाली की, सामान्यपणे जेव्हा तुम्ही आराम करत असता तेव्हा ही समस्या अधिक जास्त वाढते. कारण झोपताना तुम्ही हालचाल करत नसता.
डायबिटीस यूकेचं मत आहे की, डायबिटीक न्यूरोपॅथीला बरोबर केलं जाऊ शकत नाही. पण जळजळ आणि सुन्नता औषधांच्या माध्यमातून ठीक केलं जाऊ शकतं. सोबतच जर कुणाचं कोलेस्ट्रॉल आणि ब्लडप्रेशर नियंत्रणात राहिलं तरी सुद्धा ही समस्या दूर होऊ शकते.
नॅशनल हेल्थ सर्विसनुसार, डायबिटीसचा आणखी एक संकेत जो रात्रीच्या वेळ जास्त बघायला मिळतो तो म्हणजे पुन्हा पुन्हा लघवी लागणे. त्याशिवाय इतरही काही संकेत दिसले तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
1) फार जास्त तहान लागणे
2) फार जास्त थकवा जावणे
3) मसल्स लॉस होणे
4) प्रायवेट पार्टच्या आजूबाजूला खाज येणे
5) धुसर दिसणे