सामान्यपणे डोकेदुखी, कंबरदुखीवर लगेच उपाय करतात. पण जेव्हा पायात वेदना होतात तेव्हा विचार करतात की, आज कदाचित जास्त चालल्यामुळे असं होत असेल. जर पायांवर खाज आली तर विचार करतात की, सॉक्समुळे असं झालं असेल. पण हे असं नाहीये. पाय आणि पायांच्या पंज्यांमध्ये काही वेगळं दिसत असेल तर हा संकेत गंभीर असू शकतो.
एका एक्सपर्टने नुकतंच सांगितलं की, पायांच्या बोटांमध्ये काही असामान्य दिसत असेल तर त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण हा डायबिटीसचा संकेत असू शकतो किंवा एखाद्या दुसऱ्या आजाराचा संकेत असू शकतो. असेच काही पायांवरील डायबिटीसचे संकेत आज आम्ही सांगणार आहोत.
बोटं थंड होणे
जर तुमच्या पायांची बोटे थंड होत असतील तर हे खराब ब्लड सर्कुलेशनमुळे होतं. जे शरीरातील वेगवेगळ्या समस्यांमुळे होऊ शकतं. डायबिटीस, धमण्यांची समस्या, हार्टसंबंधी समस्या, वेरिकोज व्हेन्स, रक्ताच्या गाठी, थायरॉइड यांचा यात समावेश आहे.
नखांचा आकार बदलणे
जर कुणाच्या नखांचा आकार बदलत असेल तर त्यांनी आणखी लक्ष देण्याची गरज आहे. जर तुमच्या पायांची नखे घुमावदार किंवा वाकडी झाली असतील तर हा एनीमिया, हाइपोथायरायडिस किंवा ऑटोइम्यून डिसऑर्डरचा संकेत असू शकतो.
पायांच्या बोटांवर सूज
खराब ब्लड सर्कुलेशन किंवा लसीकासंबंधी डिसऑर्डरमुळे पायांच्या बोटांवर सूज येते. हे फंगल इन्फेक्शन, जखम, सोरायसिस आणि गाउटने सुरू होतं. सूज येण्याच्या इतर कारणांमध्ये सतत उभे राहणं, योग्य फीटिंगचे शूज न घालणं, जास्त वजन असणं, डिहायड्रेट नसणं यांचा समावेश आहे.
पंज्यांमध्ये झिणझिण्या
पॅरिपेरल न्यूरोपॅथी नावाची एक कंडिशन पायांमध्ये झिणझिण्या आणू शकते. ही समस्या सामान्यपणे डायबिटीसच्या रूग्णांमध्ये असते आणि यामुळे पायांची किंवा हातांची संवेदना नष्ट होते.