Type 2 diabetes symptoms : डायबिटीसची समस्या आजकाल फारच कॉमन झाली आहे. जगभरातील अनेक लोकांना टाइप-2 डायबिटीसची समस्या झाली आहे. तसे तर डायबिटीसची अनेक लक्षणं दिसतात. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा लक्षणाबाबत सांगणार आहोत ज्यावरून तुम्हाला टाइप 2 डायबिटीसची माहिती मिळेल. जर तुम्हाला रात्री पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागत असेल तर हे टाइप 2 डायबिटीसचं लक्षण असू शकतं.
रात्री पुन्हा पुन्हा लघवी लागणं हा या गोष्टीचा संकेत आहे की, तुमचं शरीर एक्स्ट्रा ब्लड शुगर बाहेर काढत आहे. टाइप 2 डायबिटीसची समस्या तेव्हा होते जेव्हा तुमच्या पॅनक्रियाज इन्सुलिनचं उत्पादनचं प्रमाण फार कमी होतं. इन्सुलिन एक असं हार्मोन असतं जे रक्तातील ग्लूकोजचं प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवतं.
शरीरात इन्सुलिन जेव्हा आपलं काम योग्यपणे करू शकत नाही तेव्हा ग्लूकोज रक्त कोशिकांमध्ये जमा होणं सुरू होतं. रक्त कोशिकांमध्ये ग्लूकोज अधिक प्रमाणात एकत्र होणं खूप अनहेल्दी मानलं जातं आणि हे तुमच्यासाठी नुकसानकारकही ठरू शकतं.
नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अॅन्ड केअर एक्सीलेंसच्या तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, ब्लड शुगर लेव्हल वाढल्याने अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढू शकतो.
- हार्ट डिजीज
- पेरीफेरल आर्टरी डिजीज
- स्ट्रोक
- हार्ट अटॅक
- किडनी डिजीज
- कमी दिसणं
रात्री लघवीला पुन्हा पुन्हा उठावं लागणं हा आणखीही काही आजारांचा संकेत असू शकतो. पण हाय ब्लड शुगर हे मुख्य कारण आहे.
टाइप 2 डायबिटीसची लक्षण
- सतत तहान लागणं
- थकवा जाणवणं
- विनाकारण वजन कमी होणं
- प्रायव्हेट पार्टमध्ये खाज येणं
- जखमा लवकर न भरणं
- धुसर दिसणं
तुम्हाला अशाप्रकारची काही लक्षण तुमच्या शरीरात दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करावा. डायबिटीसला मुळापासून तर संपवता येत नाही, पण वेळीच याची माहिती मिळाली तर याला कंट्रोल नक्कीच करता येतं. डायबिटीसची समस्येवर वेळीच उपचार घेतले तर तुम्हाला जास्त समस्या होणार नाहीत.
डायबिटीस असलेल्या लोकांना डॉक्टर नेहमीच लाइफस्टाईलमध्ये बदल करण्याचा सल्ला देतात. सल्ला दिला जातो की, डायबिटीसच्या रूग्णांनी रोज ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर न विसरता करावं. एका वेळचंही जेवण मिस करू नये. तसेच ज्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात शुगर, फॅट आणि मीठ असतं, ते पदार्थ टाळावेत.