शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

जुलाबाने हैराण झाला आहात? वेळीच जाणून घ्या अशावेळी काय खाऊ नये! अन्यथा गंभीर धोके

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 3:13 PM

जुलाब झाले असल्यास काय खावं आणि काय खाऊ नये, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

जुलाब लागणे (Diarrhea) हा तसा फारसा गंभीर आजार नाही. काही दिवसांमध्येच हा आजार पूर्णपणे बरा होऊन जातो. फूड पॉयझनिंग, एखाद्या औषधाचा परिणाम किंवा शिळे पदार्थ खाणं अशा गोष्टींमुळे डायरिया, म्हणजेच जुलाब होऊ शकतात. अर्थात, जर आठवड्याभरानंतरही जुलाब सुरूच राहिले, तर त्याचं कारण (Diarrhea causes) इन्फेक्शन किंवा आतड्यांची सूज असंही असू शकतं. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय खात आहात याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. जुलाब झाले असल्यास काय खावं आणि काय खाऊ नये, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

जुलाबाची लक्षणंजुलाबाची लक्षणं (Diarrhea symptoms) ही आधी सांगणं कठीण आहे. मात्र, जुलाबांमुळे थकवा, उलटी, पोटदुखी, ब्लोटिंग, ताप येणं, विष्ठेतून रक्त किंवा पू येणं, वजन कमी होणं अशा प्रकारची लक्षणं जुलाब सुरू झाल्यानंतर हळूहळू दिसू लागतात.

डायरिया झाल्यावर काय खाऊ नयेजुलाबाचा थेट संबंध हा आपल्या खाण्याशी असतो. त्यामुळे जुलाबाची लागण झालेली असताना आपण काय खातो आणि काय खाणं (What not to eat during Diarrhea) टाळायला हवं, या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. काही पदार्थ असे आहेत, जे तुमचा त्रास आणखी वाढवू शकतात. यामध्ये दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ, फ्राइड, फॅटी फूड, मसालेदार पदार्थ, प्रोसेस्ड फूड, पोर्क, कच्च्या भाज्या, कांदा, मका, आंबट फळं, दारू, कॉफी, सोडा तसंच आर्टिफिशिअल स्वीटनर घाललेले पदार्थ यांचा समावेश होतो. त्यामुळे जुलाब झालेले असताना या यादीमधील पदार्थ टाळणंच तुमच्यासाठी फायद्याचं ठरतं.

हे पदार्थ खाऊ शकताजुलाब लागल्यानंतर जास्तीतजास्त पाणी प्यायला हवं. सोबतच, कमी चहापूड टाकलेला चहा, शहाळं हेदेखील पिऊ शकता. थोडाफार आराम मिळू लागल्यास तुम्ही केळी, भात, सफरचंद, ब्रेड, अंडी आणि शिजवलेल्या भाज्या यांचंही सेवन (What can you eat during Diarrhea) करू शकता. हे सर्व पदार्थ पचायला हलके असल्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर याचा ताण येत नाही.

घरगुती उपायघरच्याघरी योग्य आहार, औषधं यांच्या मदतीने तुम्ही जुलाबावर उपचार (Diarrhea home remedies) करू शकता. कित्येक वेळा बॅक्टेरिअल इन्फेक्शन झाल्यामुळे जुलाब होतात. अशावेळी अँटिबायोटिक्स औषधाची गोळी किंवा पातळ औषध घेतल्याने मदत मिळते. सोबतच प्रोबायोटिक्स खाणंही फायद्याचं ठरतं.

या घरगुती उपायांनंतरही जुलाब ठीक होत नसतील, आणि 2 दिवसांहून अधिक काळ समस्या सुरूच राहिली; तर डॉक्टरांची भेट घेणं गरजेचं आहे. जुलाबांमधून भरपूर पाणी जाऊन डीहायड्रेटेड झाल्याने अशक्तपणा वाटत असेल, तर तातडीने डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. गंभीर स्वरुपात जुलाब झाल्यास रुग्णालयात भरतीदेखील होण्याची गरज भासू शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स