- नितांत महाजनडाएटिंग हा एक शब्द आहे, जो अनेकांच्या आयुष्यात परवलीचा झालेला आहे. अनेकजण तर सतत डाएट करतात. प्रत्येक घास खाताना डाएटला हे चालतं, हे चालतच नाही असं म्हणत खातात. सतत कॅलरी मोजतात. आपण काय खाल्लं, किती खाल्लं याचा हिशेब ठेवतात. आणि एवढं करुन जरा वजन काही ग्रॅम वाढलं तरी दु:खी होतात. फिट रहायलाच हवं, चांगली काळजी घ्यायलाच हवी तब्येतीची यात शंका नाही. पण त्यासाठी डाएट फूडच खायला पाहिजे असं कुणी सांगितलं आणि समजा ते डाएट फूड खाल्लं तरी त्यातून शरीराचं योग्य पोेषण होतं का? आणि नसेलच होत तर अपाय होतो का? अपायही नसेल होत तरी आपलं पारंपरिक पौष्टिक अन्न सोडून ते महागडे पर्याय स्वीकारावेत का? असे प्रश्न अनेक आहेत. त्यातून आपण काही चूका करतोच. त्या टाळणं इष्ट.१) डाएट सॉफ्ट ड्रिंक्सआपण सॉफ्ट ड्रिंक्स पीत नाही, कारण त्यात अतिरीक्त साखर असते. त्यानं वजन वाढतं. पण डाएट सॉफ्ट ड्रिंक्स प्याल्यानं ते वाढत नाही असं नाही. ते ही तितकंच पचायला जड. त्यामुळे डाएट ड्रिंक्समुळे आपल्याला फायदा होतो हा समज चुकीचा.२) डाएट बिस्किट्सहे ही त्यातलंच प्रकरण. बिस्किटं कमीच खाणं उत्तम. डाएट म्हणून काहीजण खूप बिस्किटं खातात. त्यापेक्षा आपली पोळी-पराठे खा.३) डाएट चिवडाडाएट चिवडा बशी बशी भरुन खाणाऱ्या अनेकजणी. ते कशाला? त्यानंही वजन वाढणारच. त्यापेक्षा राजगीरा वडी, फळं असे पर्याय निवडा.४) व्हिटॅमिनच्या गोळ्या घेतात काहीजण. नाश्ता न करता, रोज ठराविक गोळी घेतात. मात्र नाश्ता न करता अशा गोळ्या घेणं घातक. त्यापेक्षा रोज ठरल्यावेळी पोटभर नाश्ता कराच.५) शुगर फ्रीशुगर फ्री गोष्टी अनेकजण खातात. ते करण्यापेक्षा योग्य प्रमाणात गूळ खाणं उत्तम.६) फायबर फूडम्हणून बाहेरुन आणून पावडरी खाण्याचं प्रमाण जास्त. त्यापेक्षा फळं,पालेभाज्या यांचा आहारात समावेश करणं उत्तम.
डाएटच्या नावाखाली तुम्ही करताय का या ‘ हेल्दी ’ चूका?
By admin | Published: June 16, 2017 1:56 PM