शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

दिवाळीत खूप खाणं झालंय ? मग आजपासुनच सुरु करा डिटॉक्स डाएट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 6:33 PM

दिवाळीत सर्वांनीच फराळावर चांगलाच ताव मारला. त्यानंतर मात्र अनेकांनी वजन वाढल्याच्या तक्रारी सुरु केल्या असणार. मनसोक्त तेलकट, तुपकट असे पदार्थ खाल्ल्यानंतर शरिराला आराम देण्याची गरज असते.

दिवाळीत सर्वांनीच फराळावर चांगलाच ताव मारला. त्यानंतर मात्र अनेकांनी वजन वाढल्याच्या तक्रारी सुरु केल्या असणार. मनसोक्त तेलकट, तुपकट असे पदार्थ खाल्ल्यानंतर शरिराला आराम देण्याची गरज असते. याचाच अर्थ बॉडी डिटॉक्स करणे आवश्यक आहे. यासाठी रोजच्या आहारात डिटॉक्स डाएटचा आजपासूनच समावेश करा. जसे आजकाल सोशल मीडियापासून काही काळ दूर राहण्यासाठी डिजीटल डिटॉक्स चा ट्रेंड आहे त्याप्रमाणेच कधीतरी बॉडी डिटॉक्स करायला हरकत नाही. डिटॉक्स डाएटचा फायदासोप्या भाषेत सांगायचे तर डिटॉक्स डाएट पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. सलग काही दिवस तेलकट पदार्थ खाल्ले असतील तर हे डाएट शरीर डिटॉक्स करते. तुमचे यकृत, आतडे यांची कार्यक्षमता सुरळीत ठेवणे, त्यांच्या कार्यात कोणताही अडथळा येऊ न देणे यासाठी शरीर डीटॉक्स व्हायला हवे. थोडक्यात काय तर शरीर निरोगी राखण्यासाठी अधूनमधून त्याला डिटॉक्स होऊ देणे गरजेचे आहे. 

 डिटॉक्स डाएट कसे करतात

डिटॉक्स हे नाव कितीही फॅन्सी वाटत असले तरी हे बाकी डाएटसारखे अवघड अजिबातच नाही. दैनंदिन जीवनात ज्या आहाराचा समावेश असतो तोच आहार यामध्ये घ्यायचा आहे. प्रोटीन्स आणि स्निग्ध पदार्थांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करायला हवा. जेणेकरुन शरीराला आरामही मिळतो आणि वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते.डिटॉक्स डाएटमध्ये या गोष्टींचा समावेश करावा

डिटॉक्स वॉटरअगदी घरी बनवता येईल असे हे पाणी आहे. तुळस, पुदिना, आलं, लिंबू हे नैसर्गिक पदार्थ शरीराला डिटॉक्स करतात. या पदार्थांचा रस पिणे शरीरासाठी उत्तम आहे. यामुळे पचनाचेही आजार होत नाही उलट शरीर संतुलित राखण्यास मदत करते. ज्यांना पाणी प्यायचे नाही त्यांनी केवळ तुळशीची पानं किंवा लिंबाची फोड किंवा आवळ्याचा तुकडा घेतला तरी चालेल.

भाज्यांचे सूप 

दिवाळीत थंडी सुरु झाली की गरम सूप पिण्याची इच्छा होते. अशावेळी भाज्या स्वच्छ धुऊन, शिजवून बनवलेले सूप आरोग्यासाठी लाभदायक आहे. पालेभाज्या, कॉर्न यांचे सूप नियमित प्यायले तर शरीर निरोगी राहील. 

नारळ पाणी 

नारळ पाणी हे कधीही शरीरासाठी हितकारकच आहे. नारळ पाणी शरिरात ऊर्जा वाढवण्याचे काम करते. यामुळे तुमचे ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते.