Lemon Peel Benefits : लिंबाचे आपल्या आरोग्याला किती फायदे होतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. भरपूर लोक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज लिंबूपाणी पितात. तर लिंबाच्या रसाचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. जास्तीत जास्त घरांमध्ये लिबांच्या रसाचा वापर करून लिंबाची साल फेकून दिली जाते. पण अनेकांना हे माहीत नसतं की, लिंबाच्या सालीमध्ये अनेक औषधी गुण असतात. लिंबूच्या सालीमध्ये कॅल्शीयम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबर असतात. म्हणूच आज आम्ही तुम्हाला लिंबूच्या सालिबद्धलचे औषधी गुणधर्म सांगणार आहोत.
औषधी म्हणून लिबांच्या सालीचा वापर करताना केवळ पिवळी झालेली सालच वापरावी. या सालीचा लेप तयार करून शरीरावर ज्या ठिकाणी वेदना होतात अशा ठिकाणी लावा. हा लेप लावल्यावर त्या ठिकाणी एका कापडाने हलकेसे बांधून ठेवा. दोन तासानंतर हा लेप काढून टाका.
कसा बनवाल हा लेप?
एका काचेच्या भांड्या लिंबूच्या काही साली घ्या. यात ३ ते ४ चमचे ऑलिन्ह ऑईल मिसळून काचेचे भांडे झाकनाने बंद करा. १५ दिवस या साली तेलात मुरल्यावर त्या तेलाने अवयवांना मालीश करा. काही काळ हे तेल शरीरावर तसेच ठेवा. थोड्या वेळाने पाण्याने अवयव स्वच्छ धुवून काढा.
लिंबूच्या सालीमध्ये व्हिटॅमीन सी आणि कॅल्शियम अधिक प्रमाणात असते. लिंबूची साल शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी लाभदायी असतात. आपल्याकडे लिंबूचे लोणचेही बनवले जाते. लिंबूच्या साली आर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिसवर गुणकारी असतात.
लिंबाच्या सालीचे इतर फायदे
वजन कमी करण्यासाठी
लिंबाच्या सालीमध्ये पेक्टिन नावाचं तत्व आढळतं. पेक्टिन शरीराचं वजन कमी करण्यास महत्वाची भूमिका निभावतं. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लिंबाच्या सालीपासून तयार चहाचं सेवन करा.
कोलेस्ट्रॉल कमी करा
शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या सालीपासून तयार चहाचं सेवन करू शकता. लिंबाच्या सालीमध्ये आढळणाऱ्या पेक्टिनमधील हायपोकोलेस्टेरोलेमिक प्रभाव कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं.
हाडं मजबूत होतात
लिंबाच्या सालीमध्ये कॅल्शिअमच प्रमाण भरपूर असतं. कॅल्शिअम हाडं मजबूत करण्यासाठी फायदेशीर असतं. शरीरात कॅल्शिअम कमी झालं तर हाडं कमजोर होऊ लागतात.
त्वचेसाठी फायदेशीर
लिंबाच्या सालीमध्ये पॉलीफेनोल्स आढळतात. ज्यात अॅंटी-एजिंग आणि अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व आढळतात. त्याशिवाय व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी सुद्धा असतात. जे त्वचेसाठी फार फायदेशीर असतात.